कुणी तरी येणार येणार गं! अपारशक्ती खुराना लवकरच बनणार बाबा; पत्नी आकृतीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल


नुकतेच बॉलिवूडमधील अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. त्यानंतर अभिनेत्री अंगिरा धर हिनेही दिग्दर्शक आदित्य तिवारीसोबत संसार थाटला. या दोन बातम्यांनंतर आता आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे अभिनेता आयुषमान खुरानाचा भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुरानाच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अपारशक्तीची पत्नी आकृती आहुजा गरोदर आहे. याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांना दिली होती. (Actor Aparshakti Khurana And Aakriti Ahuja Virtual Baby Shower Viral On Social Media)

अपारशक्तीने आकृतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. या फोटोत आकृती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. अशातच आता आकृतीच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Courtesy: Instagram/aparshakti_khurana

अपारशक्तीने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर पत्नी आकृतीच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो पत्नीसोबत पोझ देत आहे. तसेच आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप तिचे फोटो क्लिक करत आहे.

Photo Courtesy: Instagram/aparshakti_khurana

आकृतीच्या बेबी शॉवरच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण अपारशक्तीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खरं तर मागील रविवारी त्याच्या पत्नीचे बेबी शॉवर ठेवले होते. या कार्यक्रमात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त जवळच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात आयुषमान आणि ताहिरा यांचाही समावेश होता.


Leave A Reply

Your email address will not be published.