Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड वडिलांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर अभिनेत्रीने शेअर केला आजारी असलेल्या आईचा व्हिडिओ; म्हणाली…

वडिलांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर अभिनेत्रीने शेअर केला आजारी असलेल्या आईचा व्हिडिओ; म्हणाली…

गेली दिड वर्ष झाली कोरोना संसर्गाने शिरकाव केला असून अनेक नागरिक कोरोनाशी झुंज देत आहेत. अनेक लहान मुलांनाही आपले आई- वडील गमवावे लागले आहेत. याच कोरोना संसर्गमुळे बाॅलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम संभावना सेठ विषयी एक दु:खद माहिती समोर आली आहे.

संभावना सेठच्या वडिलांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. आता दुसरीकडे तिच्या आईची प्रकृतीही खालावली आहे. वडिलांच्या दुःखातून ती अजून बाहेर आली नाही. संभावनाला तिच्या आईची खूप काळजी वाटत आहे. तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती तिच्या आईसोबत बसलेली दिसते.

संभावना सेठने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ती तिच्या आईबद्दल काळजी करत बसलेली दिसत आहे. संभावनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिची आई अंथरुणावर खाली झोपलेली दिसत आहे आणि अभिनेत्री तिच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून किस करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना संभावनांने लिहिले की, “मित्रांनो, मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे आहे. मी माझ्या आयुष्यात यावेळी भावनिक गोंधळातून जात आहे. वडिलांना गमावल्यानंतर माझ्या आईला या अवस्थेत पाहणे मला खूप कठीण जात आहे. मी स्वत:ला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे किती काळ चालेल माहित नाही.”

संभावनाच्या या पोस्टवर कमेंट्स करून अनेक सेलेब्रिटी तिला धीर देत आहेत. कॉमेडी क्वीन भारती सिंग म्हणाली, “सर्व काही ठीक होईल.” तसेच शक्ती कपूरनेही लिहिले आहे की, “आंटीसाठी खूप प्रेम.”

संभावनाच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
संभाव्य सेठच्या वडिलांचे मे महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. याच्या काही दिवस आधी त्याला कोरोनाची लागण झाली. संभावनाचे वडील दिल्लीत उपचार घेत होते. वडिलांच्या मृत्यूसाठी संभावनाने हॉस्पिटलला जबाबदार धरले होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून वडिलांच्या मृत्यूसाठी हॉस्पिटलला जबाबदार धरले होते. तिने म्हटले होते की, तिच्या वडिलांची वैद्यकीयदृष्ट्या हत्या करण्यात आली आहे.

संभावनाने दिल्लीतील त्या हॉस्पिटलला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. त्यांनी उपचार केले नाहीत आणि ते रुग्णांची योग्य काळजी घेत नाहीत, असा आरोप तिने केला होता. त्याचवेळी असेही म्हटले की, ते रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य उत्तरे देत नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा