Saturday, March 7, 2026
Home कॅलेंडर खासच ना! भज्जीआधी या क्रिकेटपटूंनी आजमावलेय चित्रपटांत नशीब, कुणी झाल फ्लॉप तर कुणी…

खासच ना! भज्जीआधी या क्रिकेटपटूंनी आजमावलेय चित्रपटांत नशीब, कुणी झाल फ्लॉप तर कुणी…

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते फार जुने आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यावर चित्रपट क्षेत्रात आपले नाव कामावण्यासाठी धडपड केली आहे. यात कपिल देवपासून ते सईद किरमानींसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. अनेक क्रिकेपटूंच्या जीवनानावर आधारित चित्रपट देखील निघाले आहेत. चित्रपटात काम करण्याची संधी भल्याभल्यांना मिळते पण त्यात काही यशस्वी ठरतात तर काही अयशस्वी.

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजनसिंग गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरण्यामध्ये व्यस्त आहे. लवकरच फ्रेंडशिप या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हरभजन सिंगप्रमाणे काही असे खेळाडू देखील आहेत, जे अनेक चित्रपटात दिसले आहेत. यापैकी आपण काही अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना आपले नशीब चित्रपट क्षेत्रात आजमावले.

अजय जडेजा
नव्वदीच्या दशकात अजय जडेजाने क्रिकेट विश्वात आपले नाव खूप कमावले होते.पण २००० सालच्या मॅच फिक्सिंग मध्ये त्याचे नाव आल्यामुळे त्याचे करियर पूर्णतः संपुष्टात आले. त्यानंतर त्याने २००३ साली ‘खेल’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी आणि सेलिना जेटली हे प्रमुख भूमिकेत होते. परंतु त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. यानंतर त्याने सन २००९ मध्ये ‘पल पल दिल के साथ’ मध्ये देखील काम केले.

सलील अंकोला
सचिन तेंडुलकर सोबत आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या सलील अंकोलाची क्रिकेट कारकीर्द फार कमी होती. त्यानंतर त्याने चित्रपटात आपले नशीब आजमावले. कुरुक्षेत्र, पितामह आणि ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त करम अपना अपना आणि बहुचर्चित रियालिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये देखील तो दिसला होता. त्यानंतर पुन्हा त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.

विनोद कांबळी
९० च्या दशकामध्ये क्रिकेटमध्ये विनोद  कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी फार लोकप्रिय होती. क्रिकेटमध्ये त्यांनी आपली शानदार खेळी खेळून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. यातील विनोद कांबळीने अभिनयात नशीब आजमावून पाहिले. काही काळाने त्यांने अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. सन २००२ मध्ये आलेल्या ‘अनर्थ’ या चित्रपटात त्याने सुनील शेट्टी आणि संजय दत्त सोबत काम केले होते. हा चित्रपट फारसा चालला नाही, त्यानंतर विनोद कांबळी  चित्रपटांमध्ये दिसला नाही.

एस श्रीसंत
मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेला श्रीसंत हा फार काळ क्रिकेटपासून दूर होता. क्रिकेटनंतर त्याने चित्रपटसृष्टीमध्ये आपले नशीब आजमावायला सुरुवात केली. तो ‘अक्सर २’ या हिंदी चित्रपटांमध्ये दिसला होता. परंतु हा चित्रपट तितकासा चालला नाही. तो बिग बॉस या रिऍलिटी शोमध्येही दिसला होता.

संदीप पाटील
भारतीय संघाचा माजी निवड समिती प्रमुख आणि माजी भारतीय फलंदाज संदीप पाटीलने आपला मित्र सईद किरमानी सोबत ‘कभी अजनबी’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला होता, ज्यावेळी संदीप पाटील आणि सय्यद किरमाणी हे १९८५ च्या वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचा भाग होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितका चालला नाही व फ्लॉप झाला.

कपिल देव
भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कॅप्टन कपिल देव यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले आहे. त्यांनी हरियाणा हरिकेन, मुझसे शादी करोगी, इकबाल आणि चेन कुली की मेन कुली या चित्रपटात काम केले आहे. पण त्यांचे हे चित्रपट तितकेसे चालले नाहीत.

सईद किरमानी
सईद किरमानी यांनी भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी भारतीय फलंदाज संदीप पाटील यांच्यासोबत ‘कभी अजनबी’ या चित्रपटात काम केले आहे.त्यात त्याने विरोधी भूमिका साकारली होती. त्यांनी त्या चित्रपटात चांगले काम केले होते, परंतू तो चित्रपट विशेष चालला नाही.

सुनील गावसकर
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी सुद्धा चित्रपटात आपले नशीब आजमावले आहे. पण ते त्यात फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी १९८० साली  ‘प्रेमाची सावली’ या चित्रपटात काम केले आहे, तर १९८८ साली ‘मालामाल’ मध्ये त्यांनी काम केले आहे. त्यानंतर ते कधीच चित्रपटात दिसले नाहीत.

हे देखील वाचा