‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच 55 वर्षांचा झाला आहे. आपल्या चित्रपटा सोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बराच चर्चेत असतो. तसेच त्याने केलेले सामाजिक कार्य देखील चर्चेत असते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, आमिर खानने किरण रावसोबत दुसरे लग्न केले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले आहे. 15 डिसेंबर 2005 मध्ये किरण आणि आमिर यांनी लग्न केले होते. तसे तर तो आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त बोलत नाही. पण मागच्या एका मुलाखतीमध्ये त्याने किरण सोबतच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
आमिरने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, “माझी आणि किरणची भेट लगान या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी किरण माझ्यासाठी केवळ एक टीमची मेंबर होती. त्यावेळी ती सहाय्यक दिग्दर्शक होती. रीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर माझी जेव्हा किरण सोबत ओळख झाली, तेव्हा आम्ही फक्त मित्र होतो,” असे आमिरने सांगितले.
यानंतर आमिरने सांगितले की, “एक दिवस किरणचा कॉल आला, तेव्हा आम्ही जवळपास अर्धा तास एकमेकांशी बोलत होतो. का माहित नाही पण किरणसोबत बोलल्यानंतर मला खूपच आनंद झाला. त्या कॉल नंतर मी किरणला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 1 ते 2 वर्ष आम्ही एकमेकांना डेट करत होतो. त्यांनतर मला या गोष्टीची जाणीव झाली की, मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. तिच्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एक खूप स्ट्राँग महिला आहे. त्यानंतर आम्ही आमच्या नात्याला नावं दिले. आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.”
आमिरने आपल्या पहिल्या बायकोबद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणतो की, “रीना ही देखील एक स्ट्राँग महिला होती. मला त्या व्यक्ती खूप आवडतात ज्या स्ट्राँग असतात. ती एक चांगली व्यक्ती होती. परंतु आमचं नात नाही टिकू शकलं. आमचा घटोस्पोट होऊनही माझ्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’
-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी