Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड BIRTHDAY SPECIAL | शाळेत असताना ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव, पाहा कोण आहे ती?

BIRTHDAY SPECIAL | शाळेत असताना ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव, पाहा कोण आहे ती?

बॉलिवूडमधील (bollywood) दिग्दर्शक करण जोहर (karan johar)आज आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. त्याने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. यामध्ये ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना केहना’, ‘स्टुडंट ऑफ द ईअर’, ‘ये दिल है मुश्किल’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. प्रेमाचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक करण जोहरही एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री…

करण आणि सुपरस्टार अक्षय कुमारची (akshay kumar) पत्नी तसेच अभिनेत्री ट्विंकल खन्ना (twinkle khanna) हे दोघेही आजकाल एका जाहिरातीमध्ये दिसत आहे. या दोघांची दमदार केमिस्ट्री सगळ्या प्रेक्षकांना पसंत पडत आहे. त्यांच्या या व्यावसायिक क्षेत्रासोबतच ते दोघे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. ही गोष्ट खूप कमी जणांना माहीत असेल की, ते दोघेही लहानपणापासूनच एकमेकांचे मित्र होते. काही वर्षांपूर्वी ट्विंकलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, करण आणि तिची मैत्री खूपच घट्ट होती.

लहान असताना ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. त्यावेळी करणला ट्विंकल खूपच आवडत होती. एवढंच काय तर करणने अगदी त्याच्या प्रेमाच्या खुलासा ट्विंकल समोर केला होत. करणने देखील एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जर त्याने कधी लग्न केले असते तर ती मुलगी ट्विंकल असली असती.

ट्विंकलने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या बालपणीच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यावेळी ती सांगते की, “करण जेव्हा बोर्डिंगमध्ये शिकत होता, तेव्हा त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो पडकला गेला. इतर मुलांनी असे करू नये म्हणून करणला सगळ्यांसमोर मुख्याध्यापकांपुढे उभे केले होते. करणची तक्रार त्याच्या आई वडिलांकडे देखील केली होती.

करणने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने ट्विंकलला टिना ही भूमिका ऑफर केली होती. परंतु तेव्हा तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. नंतर ही भूमिका राणी मुखर्जीला (rani mukharjee) मिळाली आणि तिथून तिच्या करिअरला वळण मिळाले.(april 2021 actress twinkle khanna share her childhood story about karan johar)

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा