Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड ज्याला आवाजासाठी ओळखलं जातं, त्याच अ‍ॅडमध्ये आवाज नाहीच!

ज्याला आवाजासाठी ओळखलं जातं, त्याच अ‍ॅडमध्ये आवाज नाहीच!

पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) नुकतेच एका जाहिरातीत दिसले, पण गंमत म्हणजे त्यामध्ये त्यांनी स्वतःचा आवाजच वापरला नव्हता! पंकज त्रिपाठी नुकतेच साफोला हनीच्या एका नवीन जाहिरातीत दिसले. नेहमी आपल्या जबरदस्त अभिनयासाठी आणि वेगळ्या आवाजासाठी ओळखला जाणारे पंकज त्रिपाठी या अ‍ॅडमध्ये पाहून चाहते खुश झाले. पण त्यानंतर एक असा खुलासा समोर आला,की सगळ्यांना धक्का बसला…!

खरं तर, त्या जाहिरातीत जे आवाज ऐकायला येतो, तो पंकज त्रिपाठी यांचा खरा आवाज नाहीये.याचा खुलासा खुद्द प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि रेडिओ जॉकी आर.जे. धीरज यांनी केला आहे. आर.जे. धीरजने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला आणि सांगितलं की,साफोला हनीच्या त्या अ‍ॅडमध्ये पंकज त्रिपाठी यांच्यासाठी त्यानेच डबिंग केलं आहे.

त्याने पोस्टमध्ये लिहिलं,”पंकज त्रिपाठी सरांसाठी डबिंग करून मस्त मजा आली! ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!” त्या व्हिडीओत तो स्टुडिओमध्ये डबिंग करताना दिसतो.चाहत्यांना जेव्हा कळलं की,आवाज पंकज त्रिपाठींचा नसून दुसऱ्याच माणसाचा आहे,तेव्हा सगळे थक्क झाले! अनेकांना तर विश्वासच बसला नाही.पण याचबरोबर बऱ्याच लोकांनी धीरजच्या आवाजाचं आणि परफॉर्मन्सचं जोरदार कौतुक केलं!

जसाच आर.जे. धीरजचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला,तसंच लोकांनी लगेचच प्रश्न विचारायला सुरुवात केली. एका युजरने लिहिलं,”जेव्हा मोठ्या अभिनेत्याला एवढे पैसे दिले जातात,तर मग त्याचाच मूळ आवाज का वापरत नाहीत?” दुसऱ्या युजरने धीरजचं कौतुक करत म्हटलं,”हे तर ओरिजिनलपेक्षा जास्त नैसर्गिक वाटतंय!” काही लोकांचं असंही मत आहे की, शूटिंगच्या वेळी कदाचित आवाज नीट रेकॉर्ड झाला नसेल किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल,म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून डबिंग करून घेतलं असावं.हे लक्षात ठेवायला हवं की,आर.जे. धीरज याने याआधीही मोठ्या कलाकारांसाठी आवाज दिला आहे. त्याने सलमान खानच्या ‘थम्स अप’ अ‍ॅडसाठी आणि शाहरुख खानच्या फेसवॉश अ‍ॅडसाठी पण डबिंग केलंय! आर.जे. धीरजने याआधीही बऱ्याच मोठ्या स्टार्ससाठी आवाज दिला आहे.

आता पंकज त्रिपाठीच्या कामाबद्दल बोलायचं झालं,तर ते नुकतेच ‘मेट्रो… इन दिनो’ या चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केला होता आणि यात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, नीना गुप्ता आणि अनुपम खेर हे कलाकारही होते.आता पंकज त्रिपाठी लवकरच एक फॅमिली एंटरटेनमेंट चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुण वी. शर्मा करत आहेत,तर विनोद भानुशाली आणि हिमांशु मेहरा ही जोडी प्रोड्यूस करत आहे.या चित्रपटात अदिती राव हैदरी देखील मुख्य भुमिकेमध्ये आहे.पण अजून या चित्रपटाची प्रदर्शित डेट जाहीर झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

अ‍ॅनिमल मधील इंटिमेट सीन्समुळे तृप्ती नव्हे, तिच्या बहिणीला झाला होता त्रास; कमेंट्स वाचून डिप्रेस…

हे देखील वाचा