Monday, July 1, 2024

‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

‘फिल्म सिर्फ तीन चीजो से चलती है, इंटरटेन्मेंट, इंटरटेन्मेंट, इंटरटेन्मेंट और मै इंटरटेन्मेंट हू’, हा डायलॉग आठवतोय का? कसा नाही आठवणार. या डायलॉगने एकेकाळी अक्षरशः सर्वांनाच वेड लावले होते. अभिनेत्री विद्या बालन मुळात तिच्या या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाली. तिचा ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट आजही आठवला तरी नकळत हा डायलॉग आपसूकच आपल्या तोंडातून निघतो. या चित्रपटाने विद्याची नव्याने ओळख निर्माण झाली होती.

विद्या बालनने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात तिने आव्हानात्मक भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक सुद्धा झाले. हा चित्रपट साईन करताना तिला अनेकांनी वेड्यात काढले होते. याचा खुलासा तिने आपल्या एका मुलाखतीत केला होता. पण त्यांना योग्य उत्तर देत तिने आपली जी भूमिका निभावली होती ती अगदी वाखाणण्याजोगी होती. या चित्रपटासाठी तिला विशेष राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

‘द डर्टी पिक्चर’च्या घवघवीत यशानंतर तिची अनेकांनी प्रशंसा केली होती. पण तिच्यासाठी सर्वात महत्वाची होती ती आपल्या आई- वडिलांची प्रतिक्रिया. हा चित्रपट सन २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या बायोपिकवर होता. त्यात विद्या बालन हिने स्मिताची भूमिका साकारली होती. चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. पण जेव्हा तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले गेले, तेव्हा ती फारच घाबरली होती. याचा खुलासा तिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत केला.

या मुलाखतीत तिने सांगितले कि, “माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमीच मला सर्व गोष्टींसाठी साथ देत असतात. पण जेव्हा जेव्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ आली, तेव्हा माझे आई- वडील काय म्हणतील याची मला चिंता वाटू लागली होती. ज्यावेळी ते चित्रपट पाहून ते बाहेर आले, तेव्हा माझ्या वडिलांनी अक्षरशः माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले की, ‘मला पूर्ण चित्रपटात माझी मुलगी कुठेच दिसली नाही.'” माझी आई या चित्रपटात आपल्या मुलीला मरताना पाहून फारच भावूक झाली होती आणि फार रडत होती. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून विद्या बालन फार आश्चर्यचकित झाली होती. तिच्यासाठी ही सर्वात मोठी प्रतिकिया असल्याचे तिने म्हटले आहे. शिवाय या चित्रपटात तिने ज्या ज्या लोकांसोबत काम केले, त्या सर्वांचे तिने मनापासून आभार मानले.

सिल्क स्मिताची भूमिका साकारणे हे तिच्यासाठी फार अवघड काम असल्याचे तिने सांगितले. शिवाय स्मिताची भूमिका समजून घ्यायला तिला फार वेळ लागला होता. या चित्रपटात तिच्यासोबत नसिरुद्दीन शाह, इमरान हाशमी आणि तुषार कपूर प्रमुख भूमिकेत दिसले होते. त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना तितकाच भावला होता.

विद्या बालनने आपल्या कारकिर्दीत तीन महत्त्वाचे चित्रपट केले होते. ज्यात तिने स्त्रियांच्या बाजू आपल्या भूमिकेद्वारे अचूक पद्धतीने मांडल्या होत्या. त्यात ‘इश्किया’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहाणी’ या चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती. याशिवाय ती ‘मिशन मंगल’, ‘भूल भुलैय्या’, ‘बेगम जान’, ‘कहाणी’, ‘लगे राहो मुन्नाभाई’, ‘गुरु’, ‘एकलव्य’, ‘परिणीती’ हे चित्रपट गाजले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझे वजन बनले होते राष्ट्रीय मुद्दा’, अभिनेत्री विद्या बालनची वाढत्या वजनावर प्रतिक्रिया, करावा लागला ट्रोलिंगचा सामना

-‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी

-हृदयविकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून ‘हा’ अभिनेता बनलाय माणसातील देवमाणूस

हे देखील वाचा