‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी

Actress Mrunal thakur told her struggle story, how she get her success


अनेक व्यक्तींची अशी विचारधारा असते की, जे कलाकार छोट्या पडद्यावर काम करतात ते कधीही चित्रपटात येऊ शकतं नाही. परंतु आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत पदार्पण करून अनेक कलाकारांनी ही विचारसरणी चुकीची सिद्ध केली आहे. त्या कलाकारांची संख्या अगदी कमी आहे. परंतु त्यासाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे. शाहरुख खान आणि सुशांत सिंग राजपूत हे देखील आधी छोट्या पडद्यावर काम करायचे. पण चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी खूप नाव कमावले. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होतो, ती म्हणजे ‘मृणाल ठाकूर.’ मृणाल ठाकूर हिचे चित्रपटसृष्टीतील काम जास्त नाही, पण तिने जेवढं काम केलं ते अगदी मनापासून आणि मेहनतीने केले. मृणालने तिच्या संघर्षाच्या काळातील काही गोष्ट शेअर केल्या आहेत.

तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मी चित्रपटात येण्याबाबत बोलायचे, तेव्हा अनेक लोक माझा आत्मविश्वास घालवायचे. त्यांना असे वाटत होते की, मी चित्रपटात काम नाही करू शकत. मी फक्त टीव्ही मालिकांसाठी बनले आहे. मी त्या सगळ्यांचे आभार मानते की, ज्यांनी मला असे बोलले. कारण त्या वेळेस जर ते असे बोलले नसते, तर आज मी इथपर्यंत कधीच पोहोचले नसते.”

पुढे ती म्हणते की, “आज मी जिथे आहे तिथे खूपच खुश आहे. मी सगळ्यांनी मारलेले टोमणे प्रेरणा रूपाने घेतले, आणि माझा मार्ग निश्चित केला. ज्यांना असं वाटतं की, टीव्हीवरील कलाकार चित्रपटात काम नाही करू शकत, त्या सगळ्यांचा भ्रम मी तोडला आहे.”

आज मृणालकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. ती शाहिद कपूरसोबत लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच ती फरहान अख्तरच्या ‘तुफान’ या चित्रपटाचा देखील भाग असणार आहे. मृणालने टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’ यामधून सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

याव्यतिरिक्त ती ‘लव्ह सोनिया’ आणि ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’ या चित्रपटात देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार


Leave A Reply

Your email address will not be published.