Wednesday, July 3, 2024

दारुचे व्यसन, स्पोर्ट्स कार आणि पाहिलेले मोठे अपयश, जाणून घ्या हनी सिंगचा बॉलीवूडमधील प्रवास त्याच्या खऱ्या नावासह

आजच्या पिढीसाठी संगीत हे म्युझिक आणि गाणी ही डान्स नंबर्स झाली आहे. या दोन्ही संकल्पनेत एकदम फिट बसणारा गायक म्हणजे यो यो हनी सिंग. हनी सिंग आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. हनी सिंगचे सर्वच गाणे तरुणांना वेड लावणारे असतात. सोबतच हनीचा कूल आणि डॅशिंग लुक मुलींना नेहमीच घायाळ करतो. आजच्या काळातील गाण्यांचा किंग असणारा यो यो हनी सिंग आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया हनी सिंगचा हा प्रवास.

हरदेश सिंग असे खरे नाव असणाऱ्या हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1983 साली पंजाबमध्ये झाला. गेल्याच महिन्यात हनीने त्याचा 39वा वाढदिवस साजरा केला. या क्षेत्रात आल्यानंतर त्याने त्याचे नाव यो यो हनी सिंग असे केले. यो यो या शब्दांचा अर्थ ‘आपका अपना’ असा होतो.  गायक, रॅपर, प्रोड्युसर, कंपोजर, अभिनेता, पॉप सिंगर आणि गीतकार अशा अनेक भूमिका हनी अगदी लीलया सांभाळतो. हनीला त्याच्या गाण्यांनी आणि म्युझिकने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. मात्र त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अनेक चढ उतारांनी भरलेले हा प्रवास पार करून हनीने एवढे नाव कमावले.

हनीला इंग्लिशपेक्षा हिंदी आणि पंजाबी गाणे जास्त गायला आवडतात. गायक होण्याआधी हनी रेकॉर्डिंग आर्टिस्ट आणि भांगडा प्रोड्युस करायची कामे करायचा. काही काळाने त्याने गगन सिंधूला घेऊन ‘शकल पे मत जा’ हे गाणे करत म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. हे गाणे त्याकाळी प्रचंड हिट झाले. हनी सिंग म्युझिक इंडस्ट्रीमधला सर्वात जास्त मानधन घेणारा गायक ठरला.

यासोबतच त्याने ‘बॉस’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘मेरे डॅड की मारुती’, ‘बजाते रहो’, ‘फगली’, ‘किक’, ‘कॉकटेल’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रेस 2’, ‘यरिया’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सोनू की टीटू की स्विटी’, ‘छलांग’, ‘मुंबई सागा’ अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी त्याने गाण्यांची निर्मिती केली.

गाण्यांसोबतच त्याने काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. ‘मिर्झा’ या पंजाबी सिनेमातून त्याने टायच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एकदम छोटी भूमिका असूनही त्याला उत्कृष्ट पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला. यानंतर तो अनेक पंजाबी सिनेमांमध्ये दिसला. हिंदी सिनेसृष्टीमधे त्याने 2014 साली हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोस’ या सिनेमातून अभिनय केला. समीक्षकांनी या सिनेमाला ठीक प्रतिसाद दिला, मात्र प्रेक्षकांनी हा सिनेमा फ्लॉप केला.

काही वर्षांपूर्वी अचानक हनी सिंग इंडस्ट्रीमधून गायब झाला. कुठे गेला कोणालाच माहित नव्हते. त्यातच त्याच्या मृत्यूच्या बातम्यांनी कहर केला होता. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा फोटो टाकून ही खोटी बातमी पसरवण्यात आली होती. मात्र हनीने स्वतः पुढे येउन सांगितले की मी जिवंत आहे. बाकी सर्व बातम्या खोट्या असल्याचा खुलासा देखील त्याने केला होता.

मात्र हनी सिंग बायपोलर डिसऑर्डर या एका गंभीर आजाराशी तो बऱ्याच काळ लढला. जवळपास 18 महिने त्याचा उपचार चालू होता. त्याच्यावर कोणतीच औषधे काम करत नव्हती. यातच त्याला दारूचे मोठे व्यसन लागले. या व्यसनामुळे हनीला खूप त्रास झाला. हे व्यसन इतके मोठे होते की, ते सोडवण्यासाठी त्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.

हनीला जेवढे मुझिकचे वेड आहे तेवढेच वेड त्याला गाड्यांचे देखील आहे. हनीकडे ऑडी क्यू7 ( Audi Q7 ), जगुआर एक्सजेएल ( Jaguar XJL ), ऑडी आर8 ( Audi R8 ) अशा अनेक महागड्या गाड्यांचे मस्त कलेक्शन आहे.

‘हाय मेरा दिल’, ‘ब्राउन रंग’, ‘हाई हील्स’, ‘ब्रेकअप पार्टी’, ‘ब्रिंग मी बैक’, ‘ब्लू आईज’, ‘इसे कहते हैं हिप हॉप हिप हॉप’, ‘देसी कलाकार’, ‘रानी तू मैं राजा’, ‘पार्टी ऑन माई माइंड’, ‘पंजाबियां दी बैटरी’, ‘लुंगी डांस’, ‘बॉस टाइटल ट्रेक’, ‘पार्टी ऑल नाईट’, ‘सनी सनी’, ‘चार बोतल वोडका’, ‘पार्टी विद भूतनाथ’, ‘आता माझी सटकली’, ‘बर्थडे बैश’, ‘मैनू प्यार ना मिले तो मरजवा’ आदी अनेक सुपर डुपर हिट गाणी त्याने केली आहेत.(april 2021 birthday special know yo yo honey singh unknown facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’

‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा