सत्तरच्या दशकात अनेक हीट कलाकारांमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेता म्हणजे नवीन निश्चल. त्यांच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सच्या जोरावर त्यांनी सर्वत्र त्यांची ओळख निर्माण केली. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरही चाहत्यांच्या मनात त्यांची जागा निर्माण केली. अभिनयासोबतच शालेय शिक्षणातही ते कधीही मागे राहिले नाही. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये आपल्या बॅचमधील ते अव्वल (टॉपर) होते.
नवीन निश्चल यांचा जन्म 18 मार्च 1946 मध्ये पाकिस्तान मधील लाहोर येथे झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण बेंगलोर मधील मिलिटरी शाळेत झाले होते. अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईला रवाना झाले. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र मोहन सहगल हे त्यांना भेटले. ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी नवीन यांना ‘पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिकून घे,’ असा सल्ला दिला होता. त्यांनी तिथे प्रवेश घेऊन, त्या युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल देखील प्राप्त केले.
त्यानंतर त्यांच्या वडिलांचे मित्र मोहन सहगल यांनी निश्चल यांना ‘सावन भादो’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा सोबत काम करण्याची संधी दिली. नवीन यांचा हा पहिलाच चित्रपट होता. रेखा यांच्या अदाकारीमुळे त्याचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांच्या समोर अनेक निर्मात्यांची जणू रांगच लागली. त्यांनी ‘बुड्ढा मिल गया’, ‘परवाना’, ‘वो मैं नहीं’, ‘व्हिक्टोरिया नंबर 203’, ‘धर्मा’, ‘हंसते जख्म’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी लाखो मनावर अधिराज्य गाजवले होते.
निश्चल 19 मार्च 2011 साली नवीन त्यांचे मित्र रणधीर कपूर आणि गुरमित यांच्यासोबत मुंबईवरून पुण्याला होळी साजरी करण्यासाठी आले होते. रणधीर कपूर त्यांना एके ठिकाणी भेटणार होते आणि तिथून पुढे ते पुण्याला जाणार होते. परंतु त्यांची भेट होण्याआधीच नवीन यांना हृदय विकाराचा झटका आला, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना नेहमीच वेदनारहित मृत्यू हवा होता. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीत केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भज्जीची लव्हस्टोरी: एका मित्राने करुन दिली होती गीता बसराशी ओळख, गीताने दिला होता लग्नाला नकार
-चित्रपटात येण्यापूर्वी नक्षलवादी होते मिथून दा, भावाच्या मृ्त्यूने असे बदलले जीवन