रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘ये जवानी है दिवानी‘ हा चित्रपट पुन्हा एकदा 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. वरुण धवनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेबी जॉनपेक्षा हा चित्रपट दररोज अधिक व्यवसाय करत आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यामुळे चित्रपटाच्या स्क्रीन काउंटमध्येही वाढ करण्यात आली आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 6 कोटी 85 लाखांचा व्यवसाय केला. त्याचवेळी, आता चित्रपटाच्या सोमवारचे आकडेही समोर आले आहेत.
सोमवारी या चित्रपटाने 1 कोटी 25 लाखांचा व्यवसाय केला. अशाप्रकारे, चित्रपटाची एकूण कमाई (2013 आणि पुन्हा रिलीजसह) आता 197 कोटींवर पोहोचली आहे. हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी फक्त तीन कोटींनी कमी आहे. हा चित्रपट सोनू सूदच्या फतहला टक्कर देणार आहे. आगामी काळात ‘ये जवानी है दिवानी’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील होईल अशी अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
राजकुमारने कंगना रणौतला म्हटले ‘सर्वात मोठी स्टार’, म्हणाला….










