Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड तब्बल ३०० चित्रपटांत काम करुनही मिळत नव्हत्या मुख्य भूमिका, शेवटी अभिनेत्री झाली अमेरिकेत स्थायिक

तब्बल ३०० चित्रपटांत काम करुनही मिळत नव्हत्या मुख्य भूमिका, शेवटी अभिनेत्री झाली अमेरिकेत स्थायिक

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न झाल्यानंतर चंदेरी दुनियेला कायमचा राम राम ठोकला. यामध्ये 70 च्या दशकातील नावाजलेली अभिनेत्री ‘पद्मा खन्ना’ यांचा समावेश होतो. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपला ७२वा वाढदिवस साजरा केला, चला तर मंडळी मग आज आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही रम्य आठवणी

पद्मा खन्ना यांचा जन्म 10 मार्च 1949 मध्ये वाराणसी येथे झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही सीरिअल्स आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सौदागर’ या चित्रपटात काम केले होते. त्यातील ‘सजना है मुझे’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. त्यांनी लव्ह कुश, रामायण यासारख्या टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले. परंतु रामायणमधील ‘कैकयी’ या पात्राने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

पद्मा खन्ना या सात वर्षांच्या असल्यापासूनच कथ्थक शिकत होत्या. 12 वर्षांच्या होईपर्यंत त्या स्टेज परफॉर्मन्स करायला लागल्या. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच त्यांनी चित्रपटातसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु अनेक चित्रपटात त्यांना डान्सरचेचं पात्र मिळत होते. ही गोष्ट खूप कमी प्रेक्षकांना माहित असेल की, ‘पाकिजा’ या चित्रपटात पद्मा खन्ना यांनी मीना कुमारी यांच्या बॉडी डबलचे पात्र निभावले होते.

त्यांना 90 च्या दशकातील चित्रपट दिग्दर्शक ‘जगदीश सिडाना’ यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची ओळख सौदागर या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सिडाना हे त्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक होते. हळूहळू त्यांची मैत्री झाली. आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु लग्न झाल्यानंतर पद्मा खन्ना यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले आणि त्या अमेरिकेला शिफ्ट झाल्या. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे एक डान्स अकॅडमी सुरू केली. तिथे त्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना क्लासिकल डान्स शिकवतात.

पद्मा खन्ना यांनी ही डान्स अकॅडमी त्यांच्या पती सोबत चालू केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे आता ही अकॅडमी त्या आणि त्यांची दोन मुले मिळून सांभाळतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिक्षणाने इंजिनीअर असलेली अभिनेत्री रितू वर्मा आहे चेन्नई सुपर किंग्जची कट्टर फॅन, जाणून घ्या तिचा हटके प्रवास

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’

-श्रीदेवीशी केले गुप्तपणे लग्न, एकेकाळी होता नक्षलवादाशी संबंध; वाचा मिथुन चक्रवर्तींचे न ऐकलेले किस्से

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा