Friday, July 5, 2024

चिरलेल्या गळ्यासह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह; अमिताभ यांच्यासोबतच्या भुमिका विशेष गाजल्या

जीवनात कोणत्या गोष्टीचा कधी अंत कसा होईल ते सांगता येत नाही. कोणत्या व्यक्तीसोबतही कधी काय होईल याचाही अंदाज लावता येणार नाही. बॉलिवूडमध्येही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जी कधीही अपेक्षित नव्हती. परंतू, त्या घटनांमुळे बॉलिवूड नेहमीच हादरलं.

आज आपण बोलणार आहोत, अका अशा अभिनेत्रीबद्दल जिच्या अनपेक्षीत मरणाने अख्ख बॉलिवूड हादरलं होतं.  तसेच तीच्या मरणाचे कोडे आजवर देखील सुटले नाही आहेत. या अभिनेत्रीचे नाव म्हणजे उर्मिला भट्ट होत.

उर्मिला भट्ट यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपट केले होते. बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रीपैकी त्या एक होत्या. सन १९३४ मध्ये डेहराडूनमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

नाटक क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर राजकोटमधील म्युझिक अकादमीमध्ये त्या फोक डान्सर आणि गायक म्हणून रुजू झाल्या होत्या. काही काळाने गुजराती आणि राजस्थानी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.

सन १९६७ साली त्यांनी ‘हमराज’ या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्यांचा संघर्ष हा चित्रपट सुद्धा विशेष गाजला. बहुतेक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आईची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. आपल्या सिनेकारकिर्दीत त्यांनी एकूण १३० चित्रपटांमध्ये काम केले होते.

असा झाला होता मृत्यू…

दिनांक २२ फेब्रुवारी १९९७ रोजी त्या आपल्या जुहू येथील घरी एकट्याच होत्या. त्याचवेळी काही चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना दोरीने बांधले. उर्मिला यांच्या घरात जितके दागिने आणि रोकड होती ती सर्व त्यांनी लंपास केली. आणि जाता जाता त्यांनी उर्मिला ह्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना ठार मारून ते पसार झाले.

उर्मिला यांच्या हत्येची माहिती त्यावेळी समजली, जेव्हा त्यांचा जावई विक्रम पारेख हा त्यांना भेटायला आला होता. वारंवार बेल वाजवून देखील आतून दरवाजा उघडला गेला नाही. तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती त्याने त्याची पत्नी रचना हिला दिली. त्यानंतर दोघे जेव्हा घरात गेले त्यावेळी उर्मिला जमिनीवर मृत अवस्थेत होत्या आणि त्यांच्या चारही बाजूला रक्त पसरले होते.

चौकशी दरम्यान त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, सकाळी कामवाली बाई वारंवार दरवाजा वाजवत होती, पण कोणी दार उघडला नाही त्यामुळे ती निघून गेली. उर्मिला यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. परंतु त्यापैकी अंखियो के झरोखे से, गीत गाता चल, राम तेरी गंगा मैली, बालिका वधू, धुंद, आणि अलिबाबा मार्जिना हे चित्रपट विशेष गाजले.

अभिनेत्री उर्मिला भट्ट यांनी अनेक चित्रपटात काम करून जनतेच्या मनात आपली वेगळीच छाप पाडली होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर, प्रेम चोप्रा, हेमा मालिनी यांच्या आईच्या भूमिकेतील पात्र हे विशेष गाजले.

हे देखील वाचा