Monday, July 1, 2024

मिथुन चक्रवर्तीच नव्हे तर ‘या’ सेलिब्रिटींनीही गाजवलंय राजकारणाचं मैदान! अमिताभ, हेमा, धर्मेंद्र यांचाही समावेश

भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. कारण तेथे विधानसभा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशामध्ये राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारासाठीची हालचाल सुरू केली आहे. अशातच आज (७ मार्च) बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात सामील झाले. यासोबतच त्यांनी शहरातील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोदींच्या रॅलीमध्ये भाजप पक्षाचा झेंडा फडकावला.

https://www.instagram.com/p/CMHMr5HMbrC/?utm_source=ig_web_copy_link

मिथुन यांच्याव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी राजकारणाचा अनुभव घेतला आहे. यातील काही कलाकार राजकारणात यशस्वी झाले, तर काहींनी राजकारणात मिळालेले अपयश पाहून राजकारण सोडले. काही कलाकारांनी तर राजकारणात यश मिळाले तरीही राजकारण सोडले. या लेखात आपण अशाच काही कलाकारांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी अभिनयासोबत राजकारणात देखील आपले नशिब अजमावून पाहिले आहे.

अमिताभ बच्चन :
बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन ह्यांना कोणत्याच परिचयाची गरज नाहीये. सिनेसृष्टीत त्यांनी त्यांचे स्थान बळकट केले आहे. मात्र, एक काळ असा देखील आला जेव्हा अमिताभ यांनी राजकारणात येऊन निवडणूक सुद्धा लढवली.

अमिताभ हे राजीव गांधी यांचे मित्र आणि गांधी परिवाराच्या जवळचे समजले जायचे. अमिताभ यांनी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. इलाहाबादच्या सीटवर त्यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने त्यानी ही निवडणूक त्यांनी जिंकली. असे असूनही अमिताभ यांनी काही दिवसातच राजकारण सोडले ते आजपर्यंत. अमिताभ यांनी त्या निवडणुकीनंतर कधीच राजकारणात दिसले नाही.

गोविंदा :
नव्वदच्या काळात एक जबरदस्त, लोकप्रिय आणि ग्रेट डान्सर अशी ओळख असलेला गोविंदा २००४ साली राजकारणात आले आणि त्याने काँग्रेसकडून मुंबई लोकसभेसाठी निवडूकही लढवली. राम नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव करत त्यानी विजय मिळवला.

तरीही त्यांना बॉलीवूड इतके यश आणि प्रेम राजकारणात मिळाले नाही किंबहुना त्यांना ते मिळवता आले नाही. अनेक चुकीच्या निर्णयांमुळे, चुकीच्या निर्णयांना दिलेल्या पाठिंब्यामुळे तर वयाचे चुकीचे प्रमाणपत्र दिल्यामुळे ते सतत टीकेचे धनी बनत राहिले सरतेशेवटी २००८ साली त्यांनी राजकारण सोडले.

धर्मेंद्र :
बॉलीवूडवर अनेक दशक राज्य केलेले धर्मेद्र, हे अभिनयात तर यशस्वी झालेच; यासोबतच राजकारणही त्यांनी कमी वेळातच यश मिळवले. मुळातच त्यांना राजकारणात काडीमात्रही रस नव्हता. तरी त्यांनी राजस्थानच्या बिकानेर मधून २००४ साली निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.

मात्र, त्यांच्या राजकारणातल्या अरसिकतेमुळे ते राजकारणात लक्ष देऊ शकले नाही. त्यामुळे बिकानेरच्या मतदारांनी बॅनर लावून धर्मेद्र यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. नंतर धर्मेंद्र यांनी राजकारणाचा राजीनामा दिला कायमचाच.

रेखा :
बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या रेखा २०१२ साली राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, अगदीच कमी वेळा रेखा यांना राज्यसभेत बघण्यात आले.

रेखा यांच्यावर या खासदारकीच्या पदावरून अनेकवेळा टीका करण्यात आली. सभागृहात अगदीच मोजकी हजेरी, कामात ‘ना के बराबर’ असलेला सहभाग आणि खासदारनिधीचा न झालेला वापर यामुळे रेखा यांच्यावर अनेक वेळा टीका झाली.

उर्मिला मातोंडकर :
बॉलीवूडमधील मोठे मराठी नाव म्हणजे उर्मिला. सध्या अभिनयात कमी दिसणारी उर्मिला २०१९ साली काँग्रेसकडून खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. तिच्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, उर्मिलाला बॉलीवूड सारखे ‘खूबसूरत’ यश इथे मिळवता आले नाही. तिचा भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला.

उर्मिला मातोंडकरने सप्टेंबर २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नुकताच उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांसाठी कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेमा मालिनी :
‘ड्रीमगर्ल’ असणाऱ्या हेमा मालिनी २००४ पासून राजकारणात सक्रिय आहे. २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याचवर्षी त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.२०१४ साली त्यांनी भाजपकडून मथुरेच्या सीटसाठी निवडणूक लढवली आणि ती निवडणूक त्या जिंक्ल्यासुद्धा.

राज बब्बर :
राज बब्बर यांचा राजकीय प्रवास १९९४ मध्ये सुरु झाला. त्यावर्षी राज यांना समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवर पाठ्वण्यात आले. १९९९ साली ते लोकसभेवर निवडून गेले मात्र काही कारणांमुळे त्यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि ते काँग्रेस मध्ये गेले. राज बब्बर अजूनही राजकारणात सक्रिय आहे.

जया प्रदा :
जया प्रदा यांनी १९९४ मध्ये तेलगू देशम पार्टीतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलातुन बहर पडलेल्या जया यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

शत्रुघ्न सिन्हा :
शॉटगन म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा ३० वर्षपासून भाजपमध्ये होते. मात्र, निवडणुकीच्या वेळेस त्याचे तिकीट नाकारल्यानंतर त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.

जया बच्चन :
सुप्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या जया यांनी २००४ साली राजकारणात प्रवेश केला त्याचवर्षी त्यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेत पाठवण्यात आले. तेव्हापसून त्या आजतागायत त्या राजकारणात सक्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-‘मी खरा कोब्रा…’, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मिथून चक्रवर्तींचा इशारा, पाहा राजकारणाचा अनुभव घेतलेले सेलिब्रिटी

-एकेकाळी रेल्वे स्टेशनवर झोपणारे अभिनेते आज आहेत ४०० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे मालक, हॉलिवूडमध्येही पाडलीय अभिनयाची छाप

हे देखील वाचा