Monday, April 21, 2025
Home कॅलेंडर सलमानला ‘मामा’ आणि करिनाला ‘आंटी’ म्हणणाऱ्या बजरंगी भाईजानमधील ‘मुन्नी’चा थक्क करणारा प्रवास

सलमानला ‘मामा’ आणि करिनाला ‘आंटी’ म्हणणाऱ्या बजरंगी भाईजानमधील ‘मुन्नी’चा थक्क करणारा प्रवास

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात हर्षाली मल्होत्रा मुन्नीच्या भूमिकेत दिसली होती. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटापूर्वी तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. पण बजरंजी भाईजानने या छोट्या अभिनेत्रीला एक नवी ओळख दिली. ‘बजरंगी भाईजान’मध्ये जरी सलमान खान आणि करीना कपूर यांच्यासारखे स्टार्स असतील, पण तरीही हर्षलीची भूमिका नेहमीच लक्षात ठेवली जाईल. तिने या चित्रपटावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

टीव्ही मालिकेमध्येही केलंय हर्षालीने काम:
हर्षाली मल्होत्राने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘कुबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. इतकेच नव्हे तर करिश्मा कपूर आणि कीर्ती सॅनॉन यांच्यासह ती अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली आहे.

5 हजार मुलींमध्ये निवडले गेले हर्षालीला:
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील भूमिकेसाठी हर्षालीने खूप परिश्रम घेतले. असे म्हटले जाते, की ‘मुन्नी’च्या भूमिकेसाठी 5 हजार मुलींपैकी हर्षालीची निवड केली गेली होती. हर्षालीला जेव्हा कळाले की, ती सलमान खान सोबत चित्रपटात दिसणार आहे, तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. हर्षालीने जेव्हा ‘बजरंगी भाईजान’मध्ये काम केले तेव्हा ती अवघ्या 7 वर्षांची होती. या चित्रपटातील अभिनयामुळे हर्षालीने स्टार गिल्ट, स्टारडस्ट अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड जिंकले.

करीना कपूरला म्हणते आंटी:
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात हर्षालीसोबत करीना कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. या चित्रपटादरम्यान करीना आणि हर्षालीची मैत्री झाली होती. त्यामुळे हर्षाली करीनाला आंटी म्हणू लागली. सोशल मीडियावरसुद्धा करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, हर्षाली तिला ‘आंटी’ या शब्दाने संबोधित करते.

हर्षालीशी संबंधित काही रोचक तथ्य:
– हर्षाली नवी दिल्लीची आहे. पण हर्षालीच्या अभिनयानंतर तिचे आई-वडील मुंबईत शिफ्ट झाले.
– हर्षाली जेव्हा पहिल्यांदा कॅमेर्‍याच्या समोर आली, तेव्हा ती फक्त 21 महिन्यांची होती.
– ‘बजरंगी भाईजान’च्या सेटवर हर्षाली नेहमी सलमानला मामा म्हणत असे.
– हर्षालीला चित्रपटात कोंबडी (चिकन) खाताना दाखविण्यात आले आहे. खऱ्या जीवनातही हर्षालीला चिकन खूप आवडते.
– हर्षालीची खास गोष्ट म्हणजे ती खूपच लाजाळू आहे. पण थोडीशी मैत्री झाल्यानंतर तिची बडबड संपण्याचे नाव घेत नाही.
– ‘बजरंगी भाईजान’पूर्वी हर्षालीने ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाला साइन केले होते. या चित्रपटात तिची एक छोटीशी भूमिका होती, परंतु चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच तिला ‘बजरंगी भाईजान’ मिळाला.

हे देखील वाचा