Friday, July 5, 2024

काय सांगता!! चक्क आमिर खानसोबत किसिंग सीन द्यायला जुही चावला नव्हती तयार, मग पुढे दिग्दर्शकाने…

‘कामयाब नहीं काबिल बनो, काबिल बनोगे तो कामयाबी झक मार के पीछे आयेंगी’ आपल्या या सुपरहिट डायलॉगने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडमधील ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खान. त्याने केवळ देशातच नाही तर अगदी परदेशातही आपले नाव कमावले आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. आमिर खानचे नाव त्या सुपरहिट कलाकारांच्या यादीत येते, ज्याच्यासोबत प्रत्येक अभिनेत्रीला काम करण्याची इच्छा असते. त्याने एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्याने जवळपास सगळ्याच चित्रपटात किसिंग सीन दिले आहेत. पण एका चित्रपटात अभिनेत्रीने किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही, तर जुही चावला ही आहे. आज (14 मार्च) आमिर खानचा वाढदिवस आहे. चला तर त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील हा किस्सा.

आमिर खान आणि जुही चावला ही जोडी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीला खूप प्रेम दिले आहे. आमिर खानने ‘होली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटतून जुही चावला ही देखील चांगलीच लोकप्रिय झाली. तिने ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात जुही चावला आणि आमिर खान यांच्यामध्ये एक किसिंग सीन होता. जो सीन करण्यासाठी जुहीने पूर्णपणे नकार दिला होता. तिने नकार दिल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मंसुर खान यांना खूप राग आला आणि त्यांनी शूटिंग थांबवली होती.

जुहीने नकार दिल्यानंतर मंसुर खानने सगळ्यांना सांगितले की, तुम्ही जे काही काम करत आहात ते थांबवा आणि बसून राहा. नंतर मग जुही किसिंग सीन करायला तयार झाली आणि चित्रपटाची शूटिंग पुन्हा चालू झाली.

या व्यतिरिक्त आमिर आणि जुहीने ‘इश्क’ या चित्रपटात देखील एकत्र काम केले आहे. या चित्रपटात काजोल आणि अजय देवगण हे सुद्धा होते. या चित्रपटात त्या दोघांचा अत्यंत विनोदी आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. या शिवाय त्या दोघांनी ‘हम है राही प्यार के’, ‘तुम मेरे हो’, ‘दौलत की जंग’ या चित्रपटातही एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-खऱ्या आयुष्यात अविवाहित असलेल्या ‘भाईजान’ने चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीसोबत केलंय सर्वाधिक वेळा लग्न, पाहा फिल्मी वेडिंग लिस्ट

-फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीपासून ते डिंपल गर्ल प्रीती झिंटापर्यत; ‘ही’ आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची खरी नावे

हे देखील वाचा