बॉलिवूडमधील किंग खान म्हणजेच ‘शाहरुख खान.’ आपल्या रोमँटिक अंदाजाने आणि डायलॉगने त्याने नेहमीच तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक रोमँटिक आणि ऍक्शन चित्रपटात त्याने काम केले आहे. शाहरुख सोशल मीडियावर नेहमीच आपल्या गोष्टी शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक गोष्ट शेअर केली आहे.
या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये शाहरुखने सांगितले आहे की, त्याच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्याची बहीण शहनाज खान हिच्यावर खूप वाईट परिणाम झाला होता. शाहरुख खानने सांगितले की, “वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर शहनाज ना रडली ना ती कोणाशी बोलली. फक्त एका जागी एकटक बघत राहिली होती. जवळपास 2 वर्ष ती अशीच होती. या गोष्टीचा तिच्यावर खूपच परिणाम झाला होता. या एका घटनेने तिचे संपूर्ण आयुष्याचं बदलून टाकले होते.”
Taking care of a bipolar disorder sister being an orphan is the hardest thing for an individual.. The mentality needed to be very strong.. #ShahRukhKhan pic.twitter.com/RgbPiOpWLq
— ℣αɱριя౯™ (@SRKxCombatant) March 10, 2021
आज शहनाज चांगली आहे. परंतु शाहरुख असे सांगतो की, एक वेळ अशी आली होती की, डॉक्टरांनी सांगितले होते हिचे जगणे अवघड आहे. या सगळ्या परिस्थितीत शाहरुख हा त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होता.याच दरम्यान त्याला ही बातमी कळली की, त्याच्या बहिणीची तब्बेत खूप बिघडली आहे.
शाहरुख खानने सांगितले की, “मी माझ्या बहिणीला घेऊन लगेच स्वित्झर्लंडला गेलो. जेणेकरून तिच्यावर आणखी चांगल्या प्रकारे उपचार होऊ शकेल.” एकीकडे त्याच्या बहिणीवर उपचार सुरू होता, तर दुसरीकडे त्याच्या चित्रपटाची शूटिंग चालू होती. शाहरुख खानवर या सगळ्याचा खूपच ताण आला होता. तरीही त्याच्या बहिणीच्या तब्बेतीत काही फरक पडला नव्हता.
काही वर्षांनंतर शहनाजच्या तब्बेतीत फरक पडला आणि ती आधीसारखी व्यवहार करू लागली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा