Friday, July 5, 2024

कोट्याधीश असणाऱ्या सलमान खानवर आली होती वाईट वेळ, फी न भरल्याने काढले होते वर्गाच्या बाहेर, मग वडिलांनी…

आईवडील आपल्या मुलांसाठी सगळं काही करत असतात. एक वेळी ते स्वत:च्या पोटाला चिमटा काढतील, पण मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मुलांच्या प्रत्येक समस्येमध्ये ते ढाल बनून त्यांच्यावर येणारे प्रत्येक संकट स्वतः झेलतात. पण मुलांना त्या गोष्टीची झळ देखील लागू देत नाही. असंच काहीस घडलं होतं बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानसोबत. या बाबतीत माध्यमांशी बोलताना सलमान खानने स्वत: खुलासा केला होता.

कपिल शर्माच्या शोमध्ये एकदा सलमान खानने हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता की, तो चौथीमध्ये होता. त्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे त्याचे वडील सलीम खान यांना त्याच्या शाळेची फी भरता आली नव्हती. या कारणावरून त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी त्याला वर्गातून बाहेर काढले होते आणि झेंडा लावतो त्या पोलखाली उभे केले होते.

त्यावेळी सलमान खानला माहित नव्हते की, त्याला कोणत्या कारणामुळे शिक्षा मिळाली आहे. त्यावेळीच त्याचे वडील सलीम खान तेथून जात होते. त्यांनी त्याला पाहून विचारले की, ‘आता आणखी तू काय केलंस?’ यावर सलमानने उत्तर दिले की, ‘मला नाही माहित पण मुख्याध्यापकांनी मला सकाळपासून इथे उभे केले आहे.’

सलमान खान याने सांगितले की, त्याच्या शिक्षेचे कारण विचारण्यासाठी त्याचे वडील जेव्हा मुख्याध्यापकांकडे गेले, तेव्हा त्यांनी फी भरली नाही हे कारण सांगितले. त्यावर त्याचे वडील म्हणाले की, ‘फी सलमान नाही मी भरतो. त्यामुळे तुम्ही त्याला असं वर्गातून बाहेर नाही काढू शकत. मी सध्या आर्थिक चणचणीतून जात आहे. पण मी तुमची फी नक्की देणार आहे. तरीही तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या.’ असं म्हणून ते झेंड्याच्या पोल खाली उभे राहायला गेले होते.

सलमान खान सध्या आपल्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका

हे देखील वाचा