बॉलिवूडमध्ये एक असा प्रश्न आहे जो आजपर्यंत बर्याच वेळा विचारला गेला, पण त्याचे उत्तर कधीच मिळाले नाही. हा प्रश्न आहे सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा. त्याचे चाहते, अनेक सेलेब्स आणि कित्येक लोकांनी सलमानला हा प्रश्न विचारला आहे. पण आजपर्यंत कोणालाही सलमानकडून उत्तर मिळाले नाही.
सलमान खान सध्या 55 वर्षांचा आहे. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात बर्याच सुंदर मुली आल्या आणि गेल्याही. पण आजपर्यंत सलमानला स्वत: साठी वधू सापडली नाही. खऱ्या आयुष्यात सलमानचे अद्याप लग्न झाले नसले, तरी चित्रपटाच्या आयुष्यात त्याने अनेकदा लग्न केले आहे. पण बॉलिवूडमध्ये अशी एक सुंदर अभिनेत्री देखील आहे, जिच्याबरोबर सलमानचे अनेक वेळा फिल्मी लग्न झाले आहे.
करिश्मा कपूर
अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत सलमान खानने चित्रपटात लग्न केले. पण अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे नाव सलमानच्या फिल्म वेडिंग लिस्टमध्ये अव्वलस्थानी आहे. होय, बरोबर वाचले. अनेक चित्रपटात अभिनेत्री करिश्मा कपूरने सलमानशी लग्न केले आहे. तसे तर बऱ्याच सिनेमांमध्ये सलमान-करिश्मा यांनी अभिनय केला. पण ‘जीत’, ‘बीवी नंबर वन’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘जुडवा’, ‘चल मेरे भाई’ या सिनेमांत दोघांचे लग्न झाले होते. चित्रपटातील या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.
माधुरी दीक्षित
सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितची जोडी स्क्रीनवर एकदम हिट आहे. ‘साजन’ आणि ‘हम आपके है कौन’ सिनेमांमध्ये सलमान-माधुरीची जोडी ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. ‘साजन’मध्ये सलमान माधुरीच्या प्रेमात दिसला होता, आणि ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामध्ये त्याने माधुरीसोबत लग्न केले होते.
सोनाली बेंद्रे
सलमान खानच्या फिल्म वेडिंग लिस्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचेही नाव आहे. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटातील सोनाली-सलमानच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात सलमान आणि सोनालीच्या लग्नानेच हॅपी एंडिंग झाली होती.
असिन शर्मा
सलमान खान आणि अभिनेत्री असिन शर्मा यांची जोडी ‘रेडी’ चित्रपटात दिसली. चित्रपटात सलमान असिनला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसला. चित्रपटाचा सर्वात मजेदार सिक्वेन्स होता लग्न. ज्यामध्ये जबरदस्त अॅक्शनही पाहायला मिळाली आणि अखेर हा चित्रपट सलमान आणि असिनचे लग्न होताच संपला.
कॅटरिना कैफ
सलमान खानने बर्याचदा चित्रपटात लग्न केले. पण लोक त्याच्या खऱ्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या व्यतिरिक्त चाहत्यांना सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीवरही प्रेम आहे. इतकेच नाही तर सलमान-कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतरही ते लग्न करतील असे चाहत्यांना वाटते. चित्रपटातील दोघांच्या जोडीबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनीही ‘टायगर’ चित्रपटाच्या दोन्ही भागात पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. पण ‘भारत’ चित्रपटात सलमानने कॅटरिनाशी फिल्मी लग्न केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा










