Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड नाद करायचा न्हाय! सत्तरच्या दशकात ‘या’ अभिनेत्रींनी बिकिनी सीन्स देऊन केले होते सर्वांनाच चकित; हेलनचाही समावेश

नाद करायचा न्हाय! सत्तरच्या दशकात ‘या’ अभिनेत्रींनी बिकिनी सीन्स देऊन केले होते सर्वांनाच चकित; हेलनचाही समावेश

आजच्या काळात बॉलिवूडला खूप आधुनिक मानले जाते. कारण आता पडद्यावर जवळजवळ सर्वच अभिनेत्री बोल्ड लूकमध्ये दिसतात. तथापि, मोठ्या पडद्यावर बोल्ड स्टाईल किंवा बिकिनी परिधान करणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र, 70-80 च्या दशकात बोल्ड अभिनेत्रींकडे वेगळ्या नजरेने पाहिले जायचे. तरीही अशा बर्‍याच अभिनेत्री होत्या, ज्यांनी पडद्यावर बिकिनी घालून गोंधळ उडवला होता. चला तर मग आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ, ज्या बिकिनी परिधान करून चर्चेत राहिल्या.

शर्मिला टागोर
या यादीत पहिले नाव आहे ते शर्मिला टागोर यांचे. प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री शर्मिला टागोर या मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान करताना दिसल्या आहेत. त्या काळात शर्मिला यांनी बर्‍याचदा त्यांचे बिकिनी फोटोशूट केले. ‘अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटातील शर्मिला यांच्या बिकिनी सीनमुळे जबरदस्त चर्चा रंगल्या होत्या.

झीनत अमान
झीनतला बॉलिवूडची बिंदास आणि बोल्ड अभिनेत्री मानले जायचे. तिने एक-दोन नव्हे, तर बऱ्याच चित्रपटात बिकिनी परिधान करून सीन दिले होते. त्या काळात, जेव्हा बहुतेक बोल्ड पात्र फक्त खलनायकाच्या भूमिकेत येत असत, तेव्हा झीनत अमानने बिकिनी फोटोशूट आणि बोल्ड सीन देऊन एकच गोंधळ उडवला होता.

मंदाकिनी
मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने या चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन्स दिले होते. विशेषत: धबधब्याच्या सीनमध्ये मंदाकिनीने केवळ पांढर्‍या रंगाची साडी परिधान केली होती. या सीनसाठी मंदाकिनी अजूनही आठवली जाते. तिच्या पडद्यावरच्या बिकिनी फोटोंनीही बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या.

हेलन
सत्तरच्या दशकात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात हेलन यांची गाणी असायची. या आयटम साँग्समध्ये हेलन अतिशय बोल्ड लुकमध्ये दिसल्या. आपल्या डान्स मुव्हजने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या हेलनने बिकिनी फोटोशूटही केले होते. त्यांच्या या फोटोंची बरीच चर्चाही झाली होती.

वैजयंती माला
राज कपूर यांच्या ‘संगम’ या चित्रपटात वैजयंती माला पहिल्यांदाच बोल्ड स्टाईलमध्ये दिसल्या होत्या. वैजयंती माला यांनी प्रथमच या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती.

पाण्याखाली शूट झालेला हा सीन खूप प्रसिद्ध झाला होता. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुणे एफटीआयमध्ये आपल्या बॅचचे टॉपर होते ‘नवीन निश्चल’, मिळाला जसा हवा होता तसाच मृत्यू, टाका एक नजर

-‘या’ कारणामुळे बनावे लागले अभिनेत्री; वयाच्या सोळाव्या वर्षीच बांधली होती लग्नगाठ, वाचा ७ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

-भाजपला मिळाला पडद्यावरील ‘श्रीराम’, वाचा रामायणाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेते अरुण गोविलांबाबत काही खास गोष्टी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा