Tuesday, July 21, 2026
Home बॉलीवूड राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिक आर्यनने घेतले महाकालाचे दर्शन; कुटुंबासोबत मनोभावे केली शयन आरती

राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिक आर्यनने घेतले महाकालाचे दर्शन; कुटुंबासोबत मनोभावे केली शयन आरती

अभिनेता कार्तिक आर्यनला नुकताच ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा हा चित्रपट 2024 साली चित्रपटगृहात आला होता. तर त्याचा हा पहिला राष्टीय पुरस्कार होता. त्यामुळे हा पुरस्कार जिंकल्यानंतर तो खुप आंनदी होता. त्याने हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांच्या कुटुंबासोबत हा आंनद त्याने साजरा केला आहे. आणि तो आता आई-वडिलांसोबत उज्जैनला महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला आहे. 

कार्तिकने आपल्या कुटुंबासोबत पवित्र शयन आरतीमध्ये भाग घेतला आणि बाबांना वंदन केले. त्यांने तिथे गेलेले उज्जैन दौऱ्याचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. तर त्यांचे व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये, गर्भगृहात वंदन केल्यानंतर कार्तिक आपल्या कुटुंबासोबत नंदी हॉलमध्ये हात जोडून बसलेला दिसत आहे. त्याने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये, तो महाकाल मंदिरासमोर हात पसरून उभा आहे. त्याने फोटोला ‘जय महाकाल’ असे कॅप्शन दिले.

कार्तिक (kartik)आर्यनने महाकालेश्वर मंदिरातील आपला फोटो शेअर करताच, सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यानी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हणले आहे की, तु असाच पुढे जा, एकाने म्हणले आहे तु असाच चमकत रहा आणि तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो. अश्या त्याला अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

18 जुलै, 2026 रोजी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2024 मधील उत्कृष्ट चित्रपटांसाठी 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. कार्तिकला त्याच्या 2024 मधील ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो हा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार ममूटीसोबत विभागून दिला, ज्यांना ‘ब्रह्मयुगम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा

रिलीज आधीच ‘जन नायकन’ची ॲडव्हान्स बुकिंग मधून झाली इतक्या कोटींची कमाई

हे देखील वाचा