Saturday, June 29, 2024

नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप

नवरात्र जेव्हापासून सुरू झाली आहे, तेव्हापासून अभिनेत्री दररोज देवीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व असणाऱ्या रंगाचे कपडे परिधान करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने यावर्षी एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. दुर्गामातेने महिषासुराचा वध करण्यासाठी या नऊ दिवसात नऊ वेगवेगळे अवतार घेतले होते. त्याचप्रमाणे अपूर्वा देवीचे नवनवीन रुप धारण करून सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत आहे. मागील सातही दिवस तिने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. तिने केलेल्या या प्रयोगाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आठव्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून तिने देवीचे रुप घेतले आहे.

अपूर्वाने सोशल मीडियावर तिचे काही सरस्वती मातेच्या रूपातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. यासोबत तिने अनेक दागदागिने घातलेले दिसत आहेत. यासोबत तिने केसात गजरे आणि हातात वीणा घेतली आहे. या फोटोमध्ये पाहून कोणालाही वाटणार नाही की, हे रूप एखाद्या व्यक्तीने साकारले आहे. (apurva nemlekar share navratr special photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “नवरात्रीचा आठवा दिवस. रंग-गुलाबी, देवी-सरस्वती. सरस्वती देवी, ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे. ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.” यासोबत तिने पुढे लिहिले आहे की, “मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ”

तिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून तिने हा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे. तिच्या चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

अपूर्वा मालिका तसेच चित्रपटात काम करून नावारूपाला आली आहे. खास करून तिची ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता नावाचे पात्र खूप गाजले. या मालिकेने तिला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली, यासोबत तिने ‘तू माझा सांगाती’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा