सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप वायरल होत आहे. चेहऱ्याला केक लावलेल्या मुलीचा हा फोटो सर्वांनी पाहिला असेल, मात्र तुम्ही त्या फोटोमधल्या मुलीला ओळखले का? ही मुलगी एक मराठी अभिनेत्री आहे.
तुम्हाला झी मराठी वरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ माहितीच असेल, सहा दोस्तांची ही दिल दोस्ती रसिकांना खूपच भावली. मुख्य पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.
यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे ‘निशा’. रेश्माच्या नव-याच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी निशा म्हणजेच अभिनेत्री मंजिरी पुपाला. याच मंजिरीचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. ख्रिसमसच्या निमित्ताने मंजिरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
https://www.instagram.com/p/CJNtoALJkph/
रेड वेलवेट केक हातात घेऊन मंजिरीने “केक आणि सेलिब्रेशनचा सध्या माहौल असल्याने, तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो अतिशय योग्य वाटतोय”, असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला. संपूर्ण चेहरा आणि अंगाला लावलेला केक अशा या हटके फोटोमध्ये मंजिरीला पाहून तिचे फॅन्स आणि कलाकारही तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘भाडीपा’ फेम सारंग साठेने देखील या फोटोवर कमेंट करत ‘मला सुद्धा कॉलेजमध्ये असताना असाच केक लावला जायचा आता मला त्या वेडेपणाची आठवण झाली’ असे म्हणत कमेंट केली आहे.
‘ग्रहण’ मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. मंजिरी ही हिंदीतही बरीच लोकप्रिय आहे. मंजिरीने स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेत एसीपी अदिती देशमुखची भूमिका साकारली होती. तसेच ‘पार्टी’ या मराठी सिनेमातही मंजिरी झळकली होती. मंजिरीने अनेक हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले आहे.
मंजिरी लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘बेताल’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. हॉरर थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये मंजिरीने एका आदिवासी महिलेची भूमिका निभावली होती. मंजिरीच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. मंजिरी अभिनेत्रीसोबतच एक लेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहे.










