Monday, July 1, 2024

अरबाज खानपूर्वी ‘या’ कलाकारांनी बांधली वयाच्या 50 व्या लग्नगाठ, वाचा संपूर्ण यादी

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी दोनदा लग्न केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सची नावे सांगणार आहोत ज्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.

या यादीत पहिले नाव अरबाज खानचे आहे. अभिनेत्याने नुकतेच त्याची गर्लफ्रेंड शौरा खानसोबत लग्न केले. वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाजचे हे दुसरे लग्न आहे. या यादीत पुढचं नाव आहे अभिनेता आशिष विद्यार्थीचं. या अभिनेत्याने वयाच्या ६१ व्या वर्षी अभिनेत्री रुपाली बरुआसोबत दुसरे लग्न केले.

या यादीत अभिनेत्री नीना गुप्ता हिच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्रीने वयाच्या ६० व्या वर्षी विवेक मेहरासोबत लग्न केले. मात्र, नीनाचे हे पहिले लग्न आहे. अभिनेत्री लग्नाशिवाय आई बनली. संजय दत्तने वयाच्या 50 व्या वर्षी मान्यता दत्तसोबत लग्न केले.

मिलिंद सोमणने वयाच्या 50 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेली त्याची गर्लफ्रेंड अंकिता कवार हिच्याशी लग्न केले. कबीर बेदींनी वयाच्या ७० व्या वर्षी त्यांची गर्लफ्रेंड परवीन दोसांझसोबत तिसरे लग्न केले. याआधी त्यांनी दोनदा लग्न केले होते.

या यादीत टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्याने वयाच्या ५० व्या वर्षी गर्लफ्रेंड चांदनीसोबत दुसरे लग्न केले. याआधी त्याने अभिनेत्री जुही परमारसोबत लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम….,’ म्हणत वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खानने मांडला दुसरा संसार
महेश भट्टच्या घरी झाली ख्रिसमस पार्टी साजरी, ग्लॅमरस अंदाजात लेक आणि जावयाने लावली हजेरी

हे देखील वाचा