Monday, July 1, 2024

‘अचूक वेळ साधली’ पठाणच्या यशावर अरबाज खानने व्यक्त केले त्याचे मत, कथा एकदम साधी मात्र…

सुपरस्टार शाहरुख खानचा कमबॅक सिनेमा असलेल्या ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा कमाई करत मोठे रेकॉर्ड केले आहे. शाहरुख खानने हा सिनेमा यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. मागील फ्लॉप सिनेमांचा टॅग पुसून काढण्यासाठी त्याने हा सिनेमा हिट करण्यासाठी हर प्रयत्न केले आणि त्याचे प्रयत्न यशस्वी देखील झाले. अभिनेता अरबाज खानने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पठाण’ वर त्याचे मत व्यक्त केले आहे.

अरबाज खानने त्याचा शो असलेल्या ‘द इनविंसिबल सीरीज’बद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना ‘पठाण’वर देखील त्याने भाष्य केले. यावेळी अरबाज खान म्हणाला, “अतिशय वाईट काळातून जाणाऱ्या हिंदी सिनेसृष्टीला ‘पठाण’ सारख्या यशाची खूप गरज होती. या सिनेमाचा वेळ अतिशय अचूक ठरला. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब मागील दोन वर्षात ज्या परिस्थितीतून गेले अशात ‘पठाण’ सिनेमा त्या बिचाऱ्या व्यक्तींसाठी कोणत्या पेमेंट चेकपेक्षा कमी नव्हता. पठाण खूपच मनोरंजक आणि मस्त सिनेमा आहे. यात शाहरुख खानचा अभिनय एकदम परफेक्ट दिसून येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

पुढे अरबाज खान म्हणाला, “हा सिनेमा चांगला होता म्हणून सर्वच चांगले ठरले. हे सिनेसृष्टीसाठी देखील चांगले आहे. पठाणचे यश पाहून हे लक्षात येते की, लोकं अजूनही चांगला सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातात. दर्शकांना काहीही फरक पडत नाही की कोणाबद्दल काय लिहिले जाते, काय बोलले जाते. जर तुम्ही चित्रपटाला अतिशय सामान्य पद्धतीने प्रदर्शित करतात तर प्रेक्षक नक्कीच तुमचा सिनेमा बघतील. जर तुम्ही तोड फोड कराल तर फॅन्स का त्यांचा जीव धोक्यात घालून सिनेमा पाहायला जातील.”

अरबाज खानने पुढे सांगितले, “आम्ही चित्रपटवाले लोकं आहोत. आमचे काम आमचा अटीट्युड सर्वच वेगळे आहे. यामुळे आम्हला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला आहे. नाहीतर मध्ये साऊथचे डब सिनेमे आपल्यापेक्षा जास्त चालत होते. ही पण चांगलीच गोष्ट आहे. मात्र आम्हाला आमच्या इंडस्ट्रीचा आणि फॅन्सचा विश्वास पुन्हा जिंकण्याची गरज होती. हे काम पठाणने केले.”

अरबाजने सांगितले की त्याने पठाण सिनेमा दुसऱ्या आठवड्यात मिडनाईट शोमध्ये पहिला. तो शो हाऊसफुल होता. सिनेमात कथा जरी साधी असली तरी सीन आणि ऍक्शन कौतुकास्पद होते. सोबतच सलमान खानची भूमिका देखील मस्त असल्याचे त्याने सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस

‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो

हे देखील वाचा