Monday, July 1, 2024

अरबाज खानने केला मलायकाबद्दल बोलताना खुलासा, ‘तिने दूर जावे अशी इच्छा नव्हती मात्र…’

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य मीडियामध्ये सतत गाजत आहे. वैयक्तिक गोष्टी असो किंवा व्यावसायिक त्यांना लाइमलाइट मिळतेच. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांची बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळख होती. नेहमी त्यांनी त्यांच्या उपस्थितीने लोकांना कपल गोल्स दिले. कोणत्याही सामान्य जोडीला हेवा वाटावा असे प्रेम आणि अशी जोडी होती त्यांची मात्र कुठेतरी मधेच माशी शिंकली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. एकदा एका मुलाखतीमध्ये अरबाजने त्याच्यासाठी मलायका किती महत्वाची होती हे स्पष्ट केले होते. सध्या त्याची एक क्लिप खूपच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून अरबाज आणि मलायकाला ओळखले जायचे. दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९८ साली लग्न केले. त्यानंतर ते अरहानचे आईवडील देखील बनले. मात्र २०१७ साली लग्नाच्या १९ वर्षांनी त्यानी वेगळे होणायचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या जवळच्या लोकांसोबतच त्यांच्या फॅन्ससाठी देखील मोठा धक्काच होता.

सध्या व्हायरल होणाऱ्या अरबाज खानच्या क्लिपमध्ये तो मलायकाबद्दल सांगतो की, तो जागत सर्वात जास्त मलायकाला जीव लागतो, तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. त्याला कधीच आवडणार नाही आणि त्याची कधीच इच्छा नसेल की मलायकाने त्याच्यापासून दूर जावे. सुरुवातीला त्यांच्यात सर्व नीट होते. मात्र नंतर गोष्टी बदलत गेल्या आणि त्यांचे नाते देखील काळासोबत बदलले. पुढे त्यांना जाणवले की ते या नात्यात खुश नाही आणि म्हणूनच २०१७ साली ते कायदेशीररित्या वेगळे झाले. आज मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे, तर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत मात्र मुलगा अरहानसाठी हे दोघं नेहमीच एकत्र असतात अनेक मुलासोबत वेळ घालवतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा