Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम….,’ म्हणत वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खानने मांडला दुसरा संसार

‘मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम….,’ म्हणत वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खानने मांडला दुसरा संसार

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने काल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत लग्न केले. यासह, दबंग अभिनेत्याने वयाच्या 56 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या शौरा खानसोबत दुसरे लग्न केले. अरबाजची बहीण अर्पिताच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. आता अरबाज आणि शौराचा लग्नानंतरचा पहिला फोटोही समोर आला आहे.

शौरा खानसोबतच्या लग्नानंतर नवविवाहित अरबाजने स्वत: त्याच्या वधूसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता रोमँटिक शैलीत पत्नी शौरासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. अरबाज आणि शौरा यांनी त्यांच्या लग्नात मॅचिंग आउटफिट परिधान केले होते.

फोटोंमध्ये, अरबाज खान त्याची वधू शौरा खानमध्ये हरवलेला दिसत आहे. पोशाखांबद्दल बोलायचे तर, अरबाजने त्याच्या खास दिवशी फ्लोरल प्रिंट पँट सूट घातला होता तर त्याची वधू शौरा हिने मॅचिंग फ्लोरल लेहेंगा घातला होता. फोटो शेअर करताना अरबाजने लिहिले की, “माझ्या प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीत, मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम आणि एकत्रतेची या दिवसापासून सुरुवात होते! आमच्या विशेष दिवशी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हवी आहेत!”

अरबाज खान आणि त्याची पूर्व पत्नी मलायका अरोराचा मुलगा अरहानही त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सहभागी झाला होता. यादरम्यान अरहानने त्याचे वडील अरबाज आणि त्याची नवीन आई शौरा खान यांच्यासोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अरबाज खानचे दुसरे लग्न त्याची बहीण अर्पिताच्या घरी झाले होते. भाऊ सलमान खान, सोहेल खानसह अरबाज आणि शौराचे संपूर्ण कुटुंब आणि रवीना टंडन, रितेश देशमुख-जेनेलिया डिसूझा, युलिया वंतूर, बाबा सिद्दीकी, फराह खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही लग्नाला हजेरी लावली होती.

अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोरासोबत झाले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा अरहान आहे जो सध्या शिकत आहे. अरबाज खानने शौरा खानसोबत दुसरे लग्न केले आहे. मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

महेश भट्टच्या घरी झाली ख्रिसमस पार्टी साजरी, ग्लॅमरस अंदाजात लेक आणि जावयाने लावली हजेरी
‘फायटर’ चित्रपटातील कलाकारांनी घेतली कोटींमध्ये फी, दीपिकाला मिळाले सगळ्यात कमी पैसे

 

हे देखील वाचा