Monday, July 1, 2024

‘दबंग’ सिनेमाचे बजेट १९ कोटींनी वाढल्यामुळे अरबाजला झाला तोटा, सलमानला त्याची फी मिळाली मात्र…

सलमान खान आजच्या घडीला बॉलिवूडमधील हिट सिनेमाची ग्यारंटी असलेला अभिनेता. सलमान खानचे फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय करतात. सलमानने त्याच्या मोठ्या करिअरमध्ये अनेक हिट फ्लॉप सिनेमे दिले आहेत. सलमानच्या करिअरमधला सर्वात मोठा हिट सिनेमा म्हणजे ‘दबंग’. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने सलमानला एक नवीन ओळख आणि एक नवीन नाव दिले. त्याच्या या सिनेमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. अरबाज खानचा निर्माता म्हणून पहिला सिनेमा आणि सोनाक्षी सिन्हाचा पदार्पणाच्या सिनेमा म्हणून दबंग चित्रपट ओळखला जातो. ऍक्शन कॉमेडी असलेल्या या सिनेमातील गाणी, संवाद, सलमानचा अंदाज आदी सर्वच गोष्टी लोकप्रिय झाल्या. मात्र तुम्हाला माहित आहे का? सलमानला या सिनेमासाठी असणारी त्याची फी अरबाज खानने दबंग प्रदर्शित झाल्यानंतर दिली होती. का? चला तर जाणून घेऊया.

जेव्हा दबंग सिनेमावर काम सुरु झाले तेव्हा अरबाज खानने या सिनेमासाठी ३० कोटी रुपयांचे बजेट ठरवले. मात्र सिनेमाची शूटिंग चालू झाल्यानंतर हे बजेट तब्बल १९ कोटी रुपयांनी वाढून ४९ कोटी झाले. यासाठीच अरबाज खानने सलमानला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची फी दिली. एका मुलाखतीमध्ये अरबाजने याचा खुलासा केला. पुढे तो मुलाखतीमध्ये म्हणाला, “एक सिनेमा जेव्हा हिट होतो, तेव्हा वेगवेगळ्या स्तरावर हिट होतो. चित्रपटासाठी छोट्यातला छोट्या माणसाचे देखील योगदान मह्त्वाचे असते. दबंग सिनेमाचे संगीत खूपच मस्त होते.”

पुढे तो म्हणाला, “या सिनेमात उत्तम ऍक्शन होती. लेखकांनी दिग्दर्शकांनी देखील खूप चांगले काम केले. या सिनेमाने मला एक निर्माता म्हणून ओळख दिली. मात्र जेव्हा आम्ही सिनेमा प्रदर्शित केला तेव्हा असे काही नव्हते. आम्ही दोघांनी चित्रपट बनवताना कोणताही पैसा कमावला नाही. सिनेमा हिट झाल्यानंतर मी सलमानला पैसे दिले.” दबंग हिट झाल्यानंतर २०१२ साली या सिनेमाचं पुढचा अर्थात दुसरा भाग आला तर २०१९ साली तिसरा भाग आला. या तिन्ही भागानी तुफान लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा-

हे देखील वाचा