Friday, August 1, 2025
Home मराठी अरबाजची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एंट्री; निक्कीला उचलून नेले आणि पुढे…

अरबाजची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एंट्री; निक्कीला उचलून नेले आणि पुढे…

बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन संपण्यास आता एकच दिवस राहिला आहे. उद्या बिग बॉस मराठी सीजन 5 चा आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. यावर्षी केवळ 70 दिवसातच बिग बॉसने निरोप घेतलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे. यावर्षी बिग बॉस नेट टॉप 6 स्पर्धक ठेवलेले आहेm यामध्ये अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जानवी किल्लेकर, धनंजय पवार, सुरज चव्हाण आणि निकी तांबोळी हे सदस्य आहे. आता यांपैकी नक्की कोण ट्रॉफी जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

बिग बॉस मराठी चा फिनाले अगदी काही तासांवर आलेला असताना, घरातील स्पर्धकांना एक मोठे सरप्राईज मिळालेले आहे. ते म्हणजे बिग बॉस मराठी सगळे स्पर्धक घरातील सदस्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. याबद्दल एक प्रोमो देखील समोर आलेला आहे. घरातील सगळ्या सदस्यांना पाहून फायनली आनंद झालेला आहे.

यावेळी अरबाज ने सगळ्यात शेवटी एन्ट्री घेतली. तो दारातूनच पळत आला आणि निकीला उचलून घेऊन तो बेडरूममध्ये घेऊन गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी त्याने घातलेल्या जॅकेटवर बाई या नावाचा ब्रोच देखील पाहायला मिळत आहे. बेडरूममध्ये गेल्यावर म्हणतो की, “तू मला म्हणत होती की तू जाताना रडला नाही. यावर निक्की म्हणते की, “मला वाटलं तुझं बाहेर लफडं आहे, म्हणून तू माझ्यापासून तुटला आहे” अशा प्रकारे प्रोमोसमोर आलेला आहे. परंतु या दोघांना पुन्हा एकदा पाहून प्रेक्षकांचा मात्र चांगलाच भडका उडलेला आहे. परंतु आता आजच्या भागात नक्की काय होणार आहे? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रवी तेजाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, दुखापतीतून बरा झाल्यानंतर अभिनेता या तारखेपासून सुरु करणार शूटिंग
महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा