Wednesday, June 26, 2024

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या कमरेवरील टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो तुफान व्हायरल

रुपेरी पडद्यावर हळूहळू आपले स्थान निर्माण करणारी जॉर्जिया एंड्रियानी आपला बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या बोल्डनेसद्वारे सोशल मीडियावर ती सध्या वर्चस्व गाजवत आहे. त्याचबरोबर, जॉर्जियाचा पॅपराजीच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे. हेच कारण आहे की, ती जिथे जाते तिथे कॅमेरे तिच्या मागे असतात. अलीकडेच पॅपराजींनी जॉर्जियाला अशाप्रकारे स्पॉट केले की, तिच्या टॅटूबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत. जॉर्जियाचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

टॅटूचा फोटो आला समोर
खरं तर मागील काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया तिच्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला निघाली होती. याचदरम्यान, पॅपराजींनी तिला ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्समध्ये पाहिले होते. या ड्रेसमध्ये जॉर्जिया खूप स्टायलिश आणि सुंदर दिसत होती. त्याचवेळी त्याच्या कंबरेवर बनवलेल्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जॉर्जियाच्या टॅटूमध्ये इंग्रजीतील ‘L’ हे अक्षर दिसून येत होते आणि त्याच्या आजूबाजूला फुले देखील काढलेली दिसून येत होते.

चाहत्यांना जॉर्जियाचा आवडला अंदाज
जॉर्जियाचे नवनवीन फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहते जॉर्जियाला या टॅटूचा अर्थ विचारत आहेत, तर काही चाहते तिच्या अंदाजावर फिदा झालेले दिसून येत आहेत.

जॉर्जियाने तिच्या बोल्डनेसमुळे या अगोदरच सर्वांचे लक्ष स्वतः कडे वेधून घेतले आहे. ग्लॅमरस फोटोशूटद्वारे ती तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी खूप चर्चेत राहत असते.

जॉर्जिया एंड्रियानी एक इटालियन मॉडेल त्याचबरोबर अभिनेत्री आणि डान्सर आहे. २०१८ मध्ये जेव्हा ती तिचा बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत दिसून आली होती, तेव्हापासून ती खूप चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा