Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ऐन उन्हाळ्यात लावतेय इंटरनेटवर आग! पाहा अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा बिकिनीमधील भुरळ पाडणारा व्हिडिओ

ऐन उन्हाळ्यात लावतेय इंटरनेटवर आग! पाहा अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा बिकिनीमधील भुरळ पाडणारा व्हिडिओ

अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बर्‍याचदा तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. जॉर्जिया एंड्रियानीने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बिकिनी परिधान करून ती पूलमध्ये पोहताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसून येत आहे.

जॉर्जिया एंड्रियानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती लाल बिकिनी परिधान करून पूलमध्ये पोहत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘सपोरे दी साले’ हे गाणे वाजत आहे. याव्यतिरिक्त तिने तिच्या चाहत्यांना या गाण्याचा अर्थदेखील विचारला आहे.

सन 1963 मध्ये ‘सपोरे दी साले’ हे गाणे इटालियन गायक गिनो पाओलीने गायले होते. या गाण्याचा अर्थ म्हणजे मीठाची चव. तसेच, जॉर्जिया एंड्रियानी सध्या इटलीमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.

मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर, अरबाज खानचे नाव जॉर्जिया एंड्रियानीशी जोडले गेले. अरबाजला बर्‍याचदा जॉर्जियासोबत कार्यक्रमात किंवा पार्टी करताना स्पॉट केले गेले जाते. अगदी गणेशोत्सवातही तिने अरबाजच्या कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. जॉर्जिया अशाप्रकारे अरबाजच्या कुटुंबात मिसळत असल्याच्या बातम्यांमुळे, या दोघांच्या अफेअरच्या अफवा आणखी जोर धरू लागल्या होत्या. हे पाहता अरबाज खानने स्वतः जॉर्जियाशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला. या खुलाश्यात, त्याने उघडपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर जॉर्जिया एंड्रियानी ‘वेलकम टू बजरंजपुर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘कॅरोलिन एँड कामाक्षी’ या वेब सीरिजमधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. गायक मिका सिंगसोबत जॉर्जिया एंड्रियानी ‘रूप तेरा मस्ताना’ व्हिडिओ अल्बममध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके

-तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

-भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

हे देखील वाचा