Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड फक्त खुर्चीवर बसून हसते पण इतके पैसे घेते, पाहा अर्चना पुरणसिंगची एकूण संपत्ती

फक्त खुर्चीवर बसून हसते पण इतके पैसे घेते, पाहा अर्चना पुरणसिंगची एकूण संपत्ती

कपिल शर्माचा (Kapil Sharma) कार्यक्रम असो किंवा कोणताही विनोदी कार्यक्रम असो अर्चना पुरण सिंगच्या (Archana Puran Singh) गडगडाटी हास्याशिवाय हे कार्यक्रम पुर्णच वाटत नाहीत. अर्चनाचे दमदार हास्य आणि तिच्या विनोदी प्रतिक्रिया या कार्यक्रमांचे आकर्षण वाढवत असतात. शुक्रवारी (२५ मार्च) अर्चनाचा वाढदिवस. फक्त कार्यक्रमात खुर्चीवर बसून हसणाऱ्या अर्चनाची एकूण संपत्ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल. जाणून घेऊया तिच्या संपत्तीबद्दल.

अर्चना पुरण सिंग ही हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटात म्हणा किंवा छोट्या पडद्यावर म्हणा, अर्चनाने आपल्या अभिनयाने सगळीकडे लोकप्रियता मिळवली आहे. अर्चनाने आपल्या कारकिर्दिची सुरूवात छोट्या पडद्यांवरुन केली होती. त्यानंतर तिने या चित्रपट क्षेत्रातही नशिब आजमावले.

चित्रपटातील तिच्या विनोदी भूमिका सर्वाधिक गाजल्या. अर्चनाने आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती कपिल शर्माच्या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमात फक्त हसताना दिसणारी अर्चना सिंग कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्चना सिंग एका भागासाठी तब्बल १० लाख इतकी मोठी रक्कम स्वीकारते. त्याचबरोबर अर्चनाकडे मुंबईच्या मड आयर्लंड भागात मोठा बंगला आहे. ज्यामध्ये ती आपल्या कुटूंबासोबत राहत असते. तसेच अर्चनाची एकूण संपत्ती २२० कोटीपेक्षाही जास्त आहे.

अभिनेत्री अर्चना सिंग विनोदी कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसते. ती सगळ्यात आधी ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर अर्चना सिंगने ‘शोला और शबनम’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘आशिक आवारा’ सारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. तिच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील भूमिकेला सर्वात जास्त पसंती दर्शवली होती.

अर्चनाच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ३० जून १९९२ ला परमित सेठीसोबत लग्न केले होते. परमीत सेठीसोबतच्या लग्नाआधीही अर्चनाचे एक लग्न झाले होते. मात्र या लग्नाने अर्चना सिंग खुश नव्हती. त्यामुळे तिने परमीत सेठसोबत पळून जाऊन लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

वडिलांच्या वाढदिवशी अनन्या पांडेने शेअर केले अनसीन फोटोस, एकदा पाहाच
जेव्हा चंकी पांडेंमुळे अभिनेत्री नीलम कोठारी यांचे जळाले होते पाय, तेव्हा चंकी यांनी केले ‘हे’ काम

हे देखील वाचा