Friday, December 8, 2023

जेव्हा चंकी पांडेंमुळे अभिनेत्री नीलम कोठारी यांचे जळाले होते पाय, तेव्हा चंकी यांनी केले ‘हे’ काम

चित्रपटाची शूटिंग करणे म्हणजे खरंच एक दिव्य असते. अनेक संकटाना, समस्यांना सामोरे जात सिनेमांची शूटिंग पूर्ण केली जाते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलाकार अनेक दिवस, महिने एकत्र राहतात, अशा वेळी त्यांच्यात चांगली मैत्री होणे स्वाभाविक असते. यासोबतच प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर ऑफ कॅमेरा काहींना काही किस्से, मजेशीर घटना लहान मोठ्या फरकाने घडतच असतात. काही घटना तर कायम स्वरूपी आपल्या स्मरणात राहतात. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक किस्से खूप प्रसिद्ध आहे. मुलाखतींमधून, व्हिडिओमधून हे किस्से कलाकार जगासमोर आणत असतात.

असाच अभिनेत्री नीलम कोठारींच्या संदर्भातला एक किस्सा अभिनेते चंकी पांडे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला. चंकी पांडे आणि नीलम यांनी ‘पाप की दुनिया’, ‘आग ही आग’, ‘घर का चिराग’ आदी चित्रपटांमध्ये सोबत काम केले. ९० च्या दशकात अभिनेत्री नीलम खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध होती. तिचे सौंदर्य पाहून तरुण पुरते वेडे व्हायचे. नीलमसोबत काम करायला मिळावे ही त्याकाळातल्या सर्वच अभिनेत्यांची इच्छा असायची. चंकी पांडे देखील याच यादीतले होते.

एक दिवस चंकी पांडे यांना दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी त्यांच्या एका सिनेमाची ऑफर दिली, आणि बोलता बोलता चंकी यांना सांगीतले की, नीलम या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असणार आहे. हे ऐकल्यावर तर चंकी पांडे आनंदाने वेडे झाले होते. या आनंदच्या भरात त्यांनी दिग्दर्शकांना सांगीतले की, त्यांना कार, बाइक, घोडा आदी सर्व चालवता येते.

काही दिवसांनी चित्रपटाची शूटिंग सुरु झाली. एका सीनमध्ये चंकी यांना लग्नाच्या मंडपातून नीलम यांना घेऊन पाळायचे होते. चंकी यांनी नीलमला सोबत घेतले आणि बाइकवर बसवले. यादरम्यान नीलम यांचा पाय बाइकच्या सायलेन्सरवर ठेवला गेला आणि त्यांचा पाय भाजला. चंकी यांनी लगेच त्यांना खाली उतरवले आणि त्यांची माफी मागितली. पुढे त्यांच्या पायाला मलम लावले. मला तेव्हा खूपच वाईट वाटत होते, मात्र नीलम यांनी ही घटना अगदी सामान्य सांगत काही वेळात पुन्हा उभे राहून सीन पूर्ण केला.

नीलम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या मागील अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहेत. २०२० साली नीलम ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या नेटफ्लिक्सच्या शो मध्ये दिसल्या होत्या. तर चंकी पांडे ‘हाऊसफुल ४’ सिनेमात दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

एका पायजम्यामुळे चंकी पांडेला मिळाली होती चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा तो रंजक किस्सा
Jawan Box Office Collection Day 19: तिसऱ्या सोमवारी ‘जवान’च्या कमाईत मोठी घट, 19व्या दिवशीचे कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

 

हे देखील वाचा