Sunday, June 4, 2023

…म्हणून सासूचे निधन होऊनही शोमध्ये खुर्चीवर बसून हसत होती अर्चना पूरन सिंग

मनोरंजन जगताशी निगडित स्टार्सचे आयुष्य दिसते तितके सोपे नसते. लाखो दु:ख मनात लपवून, हे कलाकार वरून हसत रसिकांचे मनोरंजन करतात. अनेक कलाकार या टप्प्यातून गेले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh). अर्चनाने अनेक कॉमेडी शोज जज केले आहेत. त्यापैकी एक ‘कॉमेडी सर्कस’ आहे, ज्यामध्ये ती १० वर्षे जज होती. या १० वर्षांत तिने आपल्या हसण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण एक वेळ अशी आली,  जेव्हा ती आतून उदास होती आणि वरून हसणे ही तिची मजबुरी होती.

सासूच्या मृत्यूच्या वेळी शोमध्ये हसत होती अर्चना पूरन सिंग
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अर्चनाने तो क्षण शेअर केला, जेव्हा ती ‘कॉमेडी सर्कस’ शोला जज करत होती. यावेळी सासूच्या निधनानंतरही तिला हसत-हसत शो जज करावा लागला. अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या सासूच्या खूप जवळ होते. त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. जेव्हा मी शूटिंगसाठी शोच्या सेटवर पोहोचले, तेव्हा अर्ध्या रस्त्यातच मला कळले की त्यांचे निधन झाले आहे. मला फोन आला. मी ज्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये जात होते, त्यांना मी याबद्दल सांगितले. प्रॉडक्शन हाऊसने मला सांगितले की, तुमच्या रिऍक्शन द्या आणि मग जा.  मी अजूनही ते विसरू शकत नाही, जेव्हा मी हसत होते आणि माझे डोके रिकामे होते. मी माझ्या सासूबाईंचा चेहरा बघण्याचाच विचार करत होते. तो काळ वेदनादायक होता.” (archana puran singh recalled the bad incident)

मुलाचा पाय मोडल्यानंतरही अर्चनाने केले होते काम
अर्चनाने १९९२ मध्ये परमीत सेठीशी लग्न केले. त्यांना दोन मुले असून, त्यांची नावे आर्यमान आणि आयुष्मान आहेत. याच मुलाखतीत अर्चनाने तो क्षणही आठवला, जेव्हा तिच्या मुलाचा पाय मोडला आणि तरीही तिला शो करावा लागला होता. अभिनेत्री म्हणाली, “आई म्हणून मला साहजिकच हसून येत नव्हते. पण जेव्हा स्पर्धक परफॉर्म करत होते, तेव्हा मला हसावे लागले. आतून मी रडत होते, पण मी ते माझ्या चेहऱ्यावर दाखवूही शकत नव्हते.”

‘द कपिल शर्मा शो’मधून ब्रेक घेतल्यानंतर अर्चना सिंग लवकरच ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’मध्ये को-जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा