जेव्हा अर्चना पूरन सिंगसोबत बच्चन यांना रंगेहाथ पकडल्याची आली होती बातमी, सगळ्यांनाच बसला होता धक्का

amitabh bachchan and archana puran singh one photo make big news


अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटांचे ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकांपेक्षा अधिक कालखंड गाजवला आहे आणि त्यांना ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ म्हणून देखील ओळखले जाते. पण या दीर्घ कारकीर्दीत बिग बी चित्रपटांव्यतिरिक्त, आपल्या प्रेम प्रकरणासाठीही बरेच चर्चेत असायचे. त्यांच्या प्रेमिकांच्या यादीत रेखा, परवीन बॉबी, झीनत अमान अशा नामांकित अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र सन १९९२ मध्ये, एका चित्रपट मासिकाच्या मुखपृष्ठावर एक फोटो छापला गेला, ज्याने सर्वत्र खळबळ उडाली.

तेव्हा वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार, त्या फोटोमुळे पत्रकार अमिताभ बच्चन यांच्या घरी सतत फोन करत होते, पण त्यांच्या घराची फोन लाइन बंद होती. मासिकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या या फोटोमध्ये बिग बींसोबत अर्चना पूरन सिंग होती. त्यावेळी प्रत्येकाला फक्त हे जाणून घ्यायचे होते की, बिग बींचे खरोखरच अर्चना पूरन सिंगसोबत प्रेमसंबंध आहेत का?

तेव्हा आलेल्या बातम्यांनुसार, त्या मासिकाने अमिताभ आणि अर्चना यांच्या फोटोसह लिहिले होते की, “अमिताभ अँड अर्चना कॅच रेड हॅन्ड इन लव्ह नेस्ट.” शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, परंतु अर्चनासोबत अमिताभ बच्चन यांना रंगेहाथ पकडले गेल्याची बातमी चाहते पचवू शकत नव्हते. या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसह त्यांच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला. पण या फोटोमागचे सत्य काहीतरी वेगळेच होते.

खरं तर, फोटोमध्ये अर्चनासोबत ते अमिताभ बच्चन नव्हते. तर अगदी त्यांच्यासारखेच दिसणारे विजय सक्सेना होते. तेव्हा समोर आलेल्या बातम्यांनुसार, जेव्हा या विषयावर त्या मासिकाशी बोलले गेले. तेव्हा त्यांनी एप्रिल फूल बनवण्याचे निमित्त देऊन हा विषय टाळला.


Leave A Reply

Your email address will not be published.