Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड सिद्धू नाही तर ‘ही’ मोठी अभिनेत्री हिसकावणार अर्चनाची खुर्ची?

सिद्धू नाही तर ‘ही’ मोठी अभिनेत्री हिसकावणार अर्चनाची खुर्ची?

बॉलीवूड अभिनेत्री आणि ‘द कपिल शर्मा शो‘ची जज अर्चना पूरण सिंग तिच्या जबरदस्त हसण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. कपिल शर्माचा संपूर्ण शो अर्चनाच्या हास्याने गुंजतो. अनेक कॉमेडी रिऍलिटी शोज जज केल्यानंतर या अभिनेत्रीने 2019 मध्ये ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंग सिद्धूची जज म्हणून जागा घेतली. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक वेळा मीम्स व्हायरल होतात, ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धूपासून अभिनेत्रीची खुर्ची धोक्यात असल्याचं म्हटलं जातं. पण, आता अर्चना पूरण सिंगने स्वत: सांगितले आहे की, तिची खुर्ची सिद्धूपासून नाही, तर दुसऱ्या व्यक्तिपासून धोक्यात आहे. काेण आहे ती व्यक्ती चला जाणून घेऊया…

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अर्चना पूरण सिंग (archana puran singh) हिने सांगितले की, “बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीपासून तिची खुर्ची धोक्यात आहे.” ती म्हणाली की, “बाॅलिवूडमध्ये फक्त अभिनेत्री काजोलच तिची जागा घेऊ शकते कारण, ती न थकता तासनतास हसू शकते.”

तर झालं असं की, काजोल तिच्या आगामी ‘सलाम वैंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. एपिसोडमध्ये, काजोल देवगण व्यतिरिक्त रेवती आणि विशाल जेठवा उपस्थित हाेते. कपिलने काजोलचे कौतुक केले आणि सांगितले की, “जेव्हा ती शोमध्ये येते तेव्हा तिच्याकडे न पाहणे त्याच्यासाठी खूप कठीण असते.” जयविजय सचान आणि राजीव ठाकूर यांनी सेटवर आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील एक दृश्य तयार केले आणि जेव्हा जयविजय सचान, शाहरुख खानची नक्कल करत ‘कुछ कुछ होता है’चा डायलॉग उच्चारतो तेव्हा काजोल हसणे थांबवू शकत नाही आणि जाेराजाेरात हसायला लागते.

काजोल म्हणते की, “जेव्हाही ती या शोमध्ये असते तेव्हा ती खूप आनंदी असते. मी इथे इतक्या जोरात हसते की, माझे गाल दुखू लागतात. मग मी विचार करते की, मी न थांबता 3 तास कसे हसू शकेन.” काजोलचे म्हणणे ऐकून अर्चना म्हणते, “माझी खुर्ची कोणी हिसकावून घेऊ शकत असेल, तर ती दुसरी कोणी नसून काजोल आहे.”

काजाेलच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर काजाेल सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट ‘सलाम वैंकी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात काजोल एका आईच्या भूमिकेत आहे जी आपला आजारी मुलगा वैंकीची काळजी घेताना दिसत आहे. (archana puran singh reveals who can replace her in the kapil sharma show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

हे देखील वाचा