मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच जास्त चर्चेत असणारं कपल. मलायका आणि अर्जुन काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र त्यांनी कधीच त्यांचं नातं मीडियापासून आणि चाहत्यांपासून लपवलं नाही. जगाची पर्वा न करता ही दोघे सरेआम एकमेकांसोबत हातात हात घालून फिरत असतात.
लवकरच आपण २०२०ला मागे टाकत २०२१ मध्ये जाणार आहोत. २०२० हे वर्ष सर्वानाच खूप त्रासदायक गेले. म्हणून २०२० ला बाय म्हणत आनंदाने २०२१ चे स्वागत करण्यासाठी सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच अनेक प्लॅन आखले आहेत. सुदैवाने २०२० च्या शेवट कोरोनाची बंधने शिथिल झाल्याने कलाकारांनी मुंबईबाहेर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करायचे ठरवले आहे.
यातच बॉलिवूडचे हॉट कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला पोहचले आहेत. या दोघांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या सुट्यांचे फोटो ‘गोवा डायरीज’ नावाने शेयर केले आहेत. नाताळ आणि २०२१ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यावर्षी यांनी गोव्याची निवड केली आहे. मलायका अरोरा तिचे आई, वडील, बहीण आणि मित्र असे या ट्रीपला गेले आहेत.
मलायका आणि तिच्या परिवाराने गोव्यातच ख्रिसमस देखील साजरा केला. सांताक्लोजच्या वेशभूषेतील मलायका आणि तिच्या परिवाराचे फोटो खूप वायरल झाले. या सुट्यांच्या फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुन गोव्याच्या बीचवर मस्ती करताना आणि आराम करताना दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये अमृता अरोरा आणि मलायका सोबत दिसत आहे. त्यांच्या या फोटोना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. फॅन्सकडून लाइक्स आणि भरभरून कमेंट्स या फोटोंवर येत आहे.
मलायका आणि अर्जुन दोघेही कोरोना संक्रमित झाले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर या दोघांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मलायका अनेक रियालिटी शो जज म्हणून दिसत असते तर अर्जुन आशुतोष गोवारीकरच्या ‘पानिपत’ सिनेमात शेवटचा दिसला होता. लवकरच म्हणजे २०२१ मध्ये त्याचा ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपट प्रदर्शित होईल. कोरोनामुळे २०२० मध्ये प्रदर्शित होणार हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.










