Saturday, June 29, 2024

वडील बोनी कपूर यांच्यासोबत एकही फोटो नाही, अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियावरुन व्यक्त केले दुख:

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी तो मोमोज खाताना दिसतो तर कधी बहीण अंशुलासोबत ‘नच पंजाबन’वर धमाकेदार डान्स करून चर्चेत येतो. आता पुन्हा एकदा अर्जुन कपूर पुन्हा एकदा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन कपूरने फादर्स डेच्या निमित्ताने वडील बोनी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमध्ये तो स्वत: बोनी कपूरसोबत दिसत नसून धाकटी बहीण खुशी दिसत आहे. शेवटी, त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर खुशी आणि बोनी कपूरचा फोटो का शेअर केला आहे. आणि याबद्दलचा खुलासाही त्याने केला आहे.

दिनांक १९ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पितृदिन म्हणून साजरा करत आहेत. यामुळे सिने जगतातील कलाकारही आपल्या वडिलांसोबतचे खास फोटो शेअर करत शुभेच्छा देताना दिसत आहेत. यामध्ये अर्जुन कपूरचीही सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.  इंस्टाग्रामवर खुशी कपूर आणि बोनी कपूर यांचा एक फोटो शेअर करत “मी वडिलांसोबतचा माझा फोटो शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला त्यांची खुशीसोबतचे आणखी फोटो सापडले.खुशी आणि गँगकडून फादर्स डेच्या शुभेच्छा,” असा कॅप्शन दिला आहे. अर्जुन कपूरने ही पोस्ट मजेशीर पद्धतीने केली आहे. फोटोसोबत त्याने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. अर्जुनने त्याची बहीण अंशुला कपूर आणि जान्हवी कपूर यांनाही पोस्टमध्ये टॅग केले.

अर्जुनच्या फोटोवर खुशी कपूरने दिलखुलास उत्तर दिलेल पाहायला मिळत आहे. अर्जुनच्या या पोस्टवर ‘द फेव्हरेट चाइल्ड’ अशी मजेशीर प्रतिक्रिया खुशीने दिली आहे. यादरम्यान एका चाहत्याने अर्जुनच्या फोटोवर कमेंट करत “तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावासह तुमचे नाव गुगल करा, तुम्हाला अनेक फोटो एकत्र मिळतील,” असा सल्ला दिला आहे. अर्जुन आणि अंशुला कपूर हे बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना सुरी यांची मुले आहेत. तर खुशी आणि जान्हवी या बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली आहेत.

https://www.instagram.com/p/Ce-vy0XLYY6/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान खुशी कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यासोबत त्याने ‘माझ्या आवडत्या व्यक्तीला फादर्स डेच्या शुभेच्छा’ असे लिहिले आहे. फोटोंचा कोलाज शेअर करताना जान्हवी कपूरने बोनी कपूर यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा