Wednesday, April 17, 2024

‘शिकार कराल तर शिकार व्हाल…’ अभिनेते सयाजी शिंदेंनी कुणाला दिला खरमरीत इशारा?

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे मराठी तसेच दाक्षिणात्य सिने जगतातील प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जातात. मराठी सिने जगतातील त्यांनी आपल्या दमदार भूमिकांनी सर्वांचीच मने जिंकली आहेत. खलनायकी भूमिका असो किंवा नायकाची भूमिका असो प्रत्येक भूमिकेत  त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयाईतकेच ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही विशेष ओळखले जातात. एक पर्यावरणप्रेमी अभिनेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सध्या सयाजी शिंदे यांची एक पोस्ट  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी शिकार करणाऱ्यांना सणसणीत इशारा दिला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे हे चित्रपट जगतातील दिग्गज खलनायक म्हणून लोकप्रिय असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते हिरो आहेत. अनेक सामाजिक कार्यांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे सयाजी शिंदे हे मातीशी घट्ट नाळ जुळलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. १० लाखांच्यावर वृक्षारोपण करणारे आणि त्यांच्या देवराईला गावागावात पोहोचवणारे पर्यावरणप्रेमी अभिनेते अशीच त्यांची ओळख आहे. सध्या त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी शिकार करणाऱ्यांना सणसणीत इशारा दिला आहे.

https://fb.watch/dKNM7mqGBt/

सयाजी शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील घाटकोपर लिंक रोडवर बगळ्याची शिकार केली जात असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये ते शिकार करणाऱ्या मुलांना जाब विचारतानाच ते पळून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरुनच सयाजी शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

या प्रकारामुळे संतापलेल्या सयाजी शिंदे यांनी शिकार कराल तर शिकार व्हाल अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देताना अशा हरामखोरांना धरुन धुतले पाहिजे अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सयाजी शिंदे यांची ही जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, तांबव्याचा विष्णुबाळा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

हे देखील वाचा