Saturday, July 6, 2024

चालू व्हिडिओतच अर्जुन कपूरच्या बहिणीने काढली ब्रा, पोस्ट पाहून प्रियांका चोप्रा म्हणाली…

फॅशनच्या या युगात, ब्रा आणि अंडरगारमेंटसाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. हे महिलांसाठी अत्यावश्यक वस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण, सोयी-सुविधांचा विचार केला, तर ते महिलांसाठी ‘झंझट’पेक्षा कमी नाही. अर्थात या विषयावर फार कमी लोक बोलतात. या प्रकरणात लाज आणि संकोचाचे मोठे कारण आहे, परंतु आता लोक या गुप्त विषयावर बोलू लागले आहेत.

अलीकडेच अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) हिने महिलांच्या सोयीच्या आड येणाऱ्या या कपड्यांचा उल्लेख केला आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. प्रत्येक स्त्रीला ही स्वतःची गोष्ट वाटत आहे. यावर अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) कमेंट केली आहे, जी जोरदार व्हायरल होत आहे. (arjun kapoor sister anshula kapoor taking off bra in a video)

व्हायरल होतोय व्हिडिओ
आपल्या भावाप्रमाणे अंशुला कपूरही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकतेच ती एक व्हिडिओ शेअर करून चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये अंशुला कपूर तिची ब्रा काढताना दिसत आहे. यानंतर ती खूप मोकळी आणि आनंदी वाटत आहे, जे तिच्या चेहऱ्यावरील भावावरून स्पष्टपणे दिसून येते. अंशुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लक्षवेधी आहे कॅप्शन
अंशुलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “संडे ब्रंचनंतर घरी परतल्यानंतर होणारी उत्तम गोष्ट.” यासोबत तिने हॅशटॅगमध्ये ‘नो ब्रा क्लब’ असे लिहिले आहे. अंशुलाच्या या व्हिडिओसोबत अनेक महिला स्वत:ला जोडू शकल्या आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://www.instagram.com/reel/CfjEq2wqf2G/?utm_source=ig_web_copy_link

काय म्हणाली प्रियांका?
अंशुलाच्या पोस्टवर कॉमेंट करताना सर्वसामान्य महिला अंशुलाच्या मुद्द्याशी सहमत आहेत, तर अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही कमेंट केली आहे. तिने व्हिडिओवर लिहिले, ‘एव्हरी डे.’ यासोबतच तिने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. प्रियांकाच्या कमेंटवरून हे स्पष्ट होते की, ती देखील घरात असताना ब्रा घालण्याच्या बाजूने नाही.

हेही वाचा

हे देखील वाचा