Friday, April 26, 2024

क्या बात है! अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने शेअर केला ट्रान्सफॉर्मेशन फोटो; म्हणाली, ‘माझं मानसिक आरोग्य…’

आवडत्या स्टार किड्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही भावंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांची मते आणि विचार त्यांच्या चाहत्यांशी शेअर करतात. नुकतीच अंशुला कपूरने एक पोस्ट शेअर करून, भावनिक नोट लिहिली आहे. अंशुलाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत.

वास्तविक, अंशुलाचे वजन खूप कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिने तिच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. अंशुलाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे. जिममधील एक फोटो शेअर करत अंशुला लिहिते, “आज माझ्यासाठी निरोगी असण्याचा अर्थ आरशात स्वतःला पाहण्यापेक्षा जास्त आहे.” (anshula kapoor two year long body transformation janhvi kapoor praising sister drastic weight loss)

अंशुला पुढे म्हणते की, “माझं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं लक्षात आल्यावर मी स्वत:ला निरोगी बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं. मी इतर कशावरही काम सुरू करण्यापूर्वी, मला हे लक्षात येऊ लागलं की मला आत काय खात आहे. हे सर्वात अस्वस्थ होतं आणि माझ्यासाठी कठीण भाग. खूप अनिश्चितता, भीती, अडथळे, अस्वस्थता, स्वत: ची शंका, मला जाणवले की मी थेरपी घ्यावी. आणि अशा प्रकारे माझ्या उपचारांना सुरुवात झाली.”

अंशुला म्हणते की, “२ वर्षांचा मोठा प्रवास झाला आहे आणि मी अजूनही प्रगतीपथावर आहे. माझ्या स्वत:च्या मूल्याचा माझ्या शरीराच्या आकाराशी काहीही संबंध नाही, हे समजायला मला बराच वेळ लागला. मला जाणवले की, माझ्या स्वतःच्या अपूर्णतेला शाप देऊन मला काही फायदा होणार नाही. मी अजूनही स्वतःवर प्रेम करायला शिकत आहे. मी माझ्यातील दोष स्वीकारत आहे. जगण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.”

अंशुलाने लिहीले की, “मी कबूल करते की माझ्यात अनेक त्रुटी आहेत, पण मी वर्थ आहे.” अंशुलाच्या या पोस्टवर कमेंट करताना जान्हवी कपूरने तिच्या परिवर्तनाचे कौतुक केले. शनाया कपूरने हार्ट इमोजी बनवली आणि हुमा कुरेशीने ‘सेक्सी’ लिहिले.

हेही वाचा

हे देखील वाचा