अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा मागील चार वर्षांपासून नात्यात आहे. त्यांचे नाते अनेक चढ-उतारांमधून जाऊनही घट्ट होते. त्यांच्या नात्याच्या दरम्यान त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, मात्र असे असूनही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. मात्र आता या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. फॅन्समध्ये अतिशय लोकप्रिय असलेले आणि सर्वात जास्त लाईमलाइट मिळवणारे कपल म्हणून अर्जुन आणि मलायका ओळखले जातात. मात्र त्यांनी ब्रेकअप केल्याच्या अनेक बातमी काही काळापासून ऐकायला येत होत्या.
आता मात्र या सर्व बातम्यांवर खुद्द अर्जुन कपूरनेच पूर्णविराम लावला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर त्याचा आणि मलायकाचा एक ब्लॅक अँड व्हाईट सेल्फी फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “अस्पष्ट आणि खोट्या अफवांसाठी जागा नाही. सुरक्षित राहा. छान राहा. लोकांसाठी शुभेच्छा. तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.” मीडियामध्ये अनेक रिपोर्टमध्ये दावा केला जात होता की या दोघांचे ब्रेकअप झाले. मागील अनेक दिवसांपासून दोघे दूर राहत आहे. असेही सांगितले गेले. मात्र कोरोनाचे संकट लक्षत घेऊन ते वेगळे राहत होते.
अर्जुनने काही दिवसांपूर्वीच त्याला आणि मलायकाला वयाच्या अंतरावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. अर्जुन आणि मलायका अनेकदा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनेक कार्यक्रमांना हे दोघे सोबत हजेरी देखील लावतात. मलायका आणि अरबाज घटस्फोट झाल्यानंतर या घटस्फोटाला अर्जुन जबाबदार असल्याचे देखील म्हटले गेले होते.
सध्या अर्जुन कपूर पुन्हा कोरोनाने संक्रमित झाला होता. त्याने घरीच उपचार घेत कोरोनाला हरवले. काही दिवसांपूर्वी तो रिया कपूरच्या घरी जेवणासाठी गेला असता जवळच राहणाऱ्या मलायकाकडे जाणे त्याने टाळले होते. मुंबईत कोरोनाच्या केस वाढल्यानंतर मलायका आणि अर्जुनला एकदा देखील सोबत स्पॉट केले गेले नाही. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या वावड्या उठल्या होत्या.
हेही वाचा :