Saturday, July 6, 2024

अर्जुन रामपाल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आणि मुलांसोबत घेतोय सुट्ट्यांचा आनंद, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केले फोटो

मागील दिड वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र जसा काळ पुढे सरकला तसा कोरोनाचा कहर कमी झाला. अनेक महिन्यांपासून घराच्या चार भिंतीत अडकलेले लोकं आता त्यांच्या कुटुंबासह बाहेर पडून सुट्यांचा आनंद घेत आहे. याला बॉलिवूड कलाकार देखील अपवाद नाही. अनेक कलाकार देशात, परदेशात सध्या फिरत असून, कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवत आहे. बॉलिवूडचा हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अर्जुन रामपाल देखील त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सध्या वेळ घालवत आहे.

अर्जुन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि मुलांसोबत मुंबईपासून लांब सुट्यांचा आनंद घेत आहे. गॅब्रिएलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या या सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मात्र ते नक्की कोणत्या ठिकाणी आहे याचा उलगडा केला नाही. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्जुनच्या दोन्ही मुली माहिका रामपाल आणि मायरा रामपाल आणि मुलगा देखील दिसत असून, सोबतच एक अर्जुन आणि गॅब्रिएलाचा रोमँटिक फोटो देखील आहे.

अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया यांनी १९९८ साली लग्न केले होते. मात्र २८ मे २०१८ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन साउथ आफ्रिकन मॉडेल, फॅशन डिझायनर गॅब्रिएलाला डेट करायला लागला. त्यातच गॅब्रिएला लग्नाआधी प्रेग्नेंट झाली आणि तिने जुलै २०१९ मध्ये अरिक नावाच्या मुलाला जन्म दिला. अर्जुनला देखील एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.

अर्जुनच्या कारकिर्दी विषयी बोलायचे झाले तर, त्याने अभिनय क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी केली आहे. नुकताच त्याचा ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच तो कंगना र्नावटच्या ‘धाकड’ सिनेमात दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

 

हे देखील वाचा