अभिनेता सलमान खान मंगळवारी गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाला होता. यासाठी तो सोहेल खानच्या घरी पोहचला. दरवर्षी प्रमाणे खान कुटुंब एकत्र येत अगदी भक्तीभावाने बाप्पाना निरोप दिला आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना त्याची कथीत प्रेयसी युलिया वंतुर, देखील सलमान खानसोबत दिसली. या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडीयावर आता व्हायरल होताना दिसुन येत आहेत. त्यामध्ये सलमान आपल्या कुटुंबासोबत आरती करताना, पाहुण्यांशी संवाद साधताना आणि मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मात्र, या सोहळ्यादरम्यान एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे जेव्हा अभिनेत्याची बहिण अर्पिता खानने आरती करण्याची योग्य पध्दत समजुन सांगितली आणि या दरम्यान व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अभिनेता सलमान खान हा सोहेल खानच्या घरी पोहचताच सोहेल खानने त्याचे स्वागत केले त्यानंतर सलमानची भाची आयताने त्याला प्रेमाने मिठी मारली. थोड्याच वेळात सलमान गणपती बाप्पाच्या आरतीत सामील झाला. त्यादरम्यान त्यांच्याकडुन एक छोटी चुक झाली. तो आरती करताना चुकीच्या दिशेने फिरवत होता. हे पाहुन त्याची बहीन अर्पिता खान त्याला हाक मारुन थांबवण्याचा प्रयत्न करु लागली. तिने पुढे होउन आरतीची योग्य पध्दत दाखवली. आणि एक चेहऱ्यावर स्मित हास्य देत सलमान खानने योग्य दिशेने आरती केली. तर भाऊ बहिणीच्या या छोट्याशा क्षणाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
गणपती विसर्जन सोहळ्यात खान कुटुंबासोबत युलिया वंतूरही उपस्थित होती. तिनेही सलमाननंतर गणपती बाप्पाची आरती केली. युलियाने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट घातला होता, युलियाच्या उपस्थितीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले. मात्र, त्यांच्या नात्याबद्दल दोघांपैकी कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा
शाहरुख खानने संपु्र्ण कुटुंबासोबत साजरा केला गणेशोत्सव, म्हणाले आज करणार बाप्पाचे विसर्जन










