Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

गायक जुबीन नौटियालवर नेटकऱ्यांचा संताप; थेट अटकेची केली मागणी, काय घडलं नेमकं ?

जुबिन नौटियाल हा हिंदी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. आपल्या जादूई आवाजाने त्याने संगीत जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुबिनची अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये सुपरहीट ठरली आहेत. त्याची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. परंतु सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ही चर्चा म्हणजे सोशल मीडियावरुन जुबैनच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

प्रसिद्ध बॉलीवूड गायक जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी  ट्विटरवरुन करण्यात आली आहे. ‘राता लाबिया’, ‘दिल गल्ती कर बैठा है’, ‘तुम ही आना’, ‘लूट गए’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा जुबिन नौटियाल त्याच्या पुढच्या सिनेमांमुळे ट्रोल झाला आहे.  #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग 9 सप्टेंबर 2022 रोजी ट्विटरवर ट्रेंड करताना दिसला. या हॅशटॅगवर हजारो ट्विट करण्यात आले त्यामधुन जुबिनला प्रचंड ट्रोल केले आणि काहींनी त्याला अटक करण्याची पोलिसांकडे मागणीही केली.

जुबिन नौटियालच्या पुढील कॉन्सर्टचे पोस्टर ट्विटरवर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये आयोजकाच्या नावावरून गदारोळ सुरू आहे. वास्तविक अनेक युजर्सनी हे पोस्टर शेअर केले आहे. रेहान सिद्दीकी या एका व्यक्तीची पोस्ट सर्वाधिक पोस्ट करण्यात आली आहे. त्यांचा आवडता गायक ह्युस्टनला येत असल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे. या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. असे या पोस्टमध्ये म्हणले आहे.

या पोस्टमध्ये जयसिंग यांच्या नावावरुन हा सगळा गोंधळ उडाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयसिंग हा वाँटेड मुस्तांडा आहे, ज्याचा पोलीस 30 वर्षांपासून शोध घेत होते. त्याच्यावर खलिस्तानला अमली पदार्थांच्या तस्करीला पाठिंबा देण्यासह गंभीर आरोप असताना, नेटकऱ्यांनी जयसिंग दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे.

ही पोस्ट शेअर करत अनेक युजर्सनी आरोप केला की जुबिन नौटियाल देशद्रोहींचा कॉन्सर्ट करतात. हे देशाच्या विरोधात आहे आणि अशा परिस्थितीत जुबिन नौटियालला अटक व्हायला हवी. झुबिनसोबतच पुन्हा एकदा युजर्सनी बॉलिवूडला घेरले आहे. यावर नेटकऱ्यांनी देशासाठी घातक असलेल्या लोकांसाठी कार्यक्रम करताना लाज वाटली पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या या प्रकरणाची सिने जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – बाप्पाच्या दर्शनासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी हजेरी, पाहा फोटो
‘या’ अभिनेत्रींनी आईची भूमिका साकारून केली नवी ओळख निर्माण, प्रेक्षकांना केलेले भावूक
‘ब्रह्मास्त्र’ टीमवर कंगना रणौतचा निशाणा; म्हणाली, ‘अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका’

हे देखील वाचा