Wednesday, July 3, 2024

भाई बोले तो एकदम कडक! अर्शद वारसीच्या कमालीच्या फिटनेसने जिंकली नेटकऱ्यांची मने

कलाकारांना आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळी भूमिका साकारायची असते. त्यासाठी त्यांना आपल्या संपूर्ण देहबोलीमध्ये देखील बदल करावा लागतो. कधी त्यांना अगदी बारीक व्हावे लागते तर, कधी खूप जाड. काही कलाकार तर भूमिका चांगली साकारता यावी म्हणून टक्कल देखील करतात. अशात मध्यंतरी अर्शद वारसीचा नवीन लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

अनेक चित्रपटांमधून आपल्या खलनायकी आणि विनोदी भूमिकेने रसिक प्रेक्षकांना राग आणणारा तर कधी खळखळून हसवणारा अर्शद आता आपल्या अनोख्या अंदाजामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्याने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे नवीन लूकमधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आणि ते काही काळातच तुफान व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये माध्यम असणाऱ्या सर्किटची आता भल्याभल्याना लाजवणारा शरीयष्टी दिसली.

त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी खूप प्रेम व्यक्त केले. अनेकजण त्याला याविषयी प्रश्न देखील विचारले होते. कोणत्या चित्रपटामध्ये तो या नवीन लूकमध्ये झळकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसली. मात्र लगेच त्याने फोटो पोस्ट करत, हा लूक त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी असल्याचे सांगितले होते.

अर्शदने आपल्या विनोदी अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपली दमदार भूमिका निभावली. परंतु त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटामधून. त्यामुळे अनेक जण त्याच्या या लूकवर कमेंट करत लिहीत आहेत की, “भाई बोले तो एकदम कडक.” तसेच दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “आइला सर्किट भाई अब मुन्ना भाई माफिक बॉडी बनाइला है.” तर आणखी एकाने लिहिले की, “सर्किट बना मुन्ना भाई.” त्याच्या या लूकची तुलना जॉन सीनासोबत देखील केली गेली. एक चाहता म्हणाला की, “अशी बॉडी, तर जॉन सीनाची देखील नाही सरजी.”

अर्शदचा नुकताच ‘बच्चन पांडे’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अर्शदने या सिनेमातून खूपच कौतुक कमावले. याशिवाय तो त्याच्या ‘असुर’ या वेब सीरिजसाठी देखील खूपच उत्सुक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा