Saturday, July 6, 2024

अफगाणिस्तानात जन्मलेल्या अर्शी खानला सतावतेय तिच्या नातेवाईकांची चिंता; म्हणाली, ‘मी तिथेच राहत असते तर आज…’

सध्या अफगाणिस्तानवर एक भयावह संकट ओढवले आहे. या घटनेने देशच काय, तर संपूर्ण जग हादरून गेले आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचे संकट आले आहे. तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. शेकडो महिला आणि मुलांचे अपहरण झाले आहे. संपूर्ण जग हे तालिबानचे अत्याचार बघत आहे. अशा स्थितीत हे सगळं पाहून प्रत्येकाच्या हृदय तुटत आहे. प्रत्येकजण अफगाणिस्तानातील लोकांसाठी प्रार्थना करत आहेत. तर प्रत्येकाला तिथल्या नागरिकांची काळजी वाटत आहे. दरम्यान ‘बिग बॉस ११’ ची स्पर्धक असलेल्या अर्शी खाननेही अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या तिच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी काळजी व्यक्त केली आहे.

अर्शी खानचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला होता. त्यानंतर ती तिच्या कुटुंबासह भारतात आली होती. अर्शी तिथे राहणाऱ्या महिला आणि मुलींच्या हक्कांबद्दल चिंतित आहे. माध्यमातील वृत्तानुसार अर्शी खान म्हणाली की, “माझा जन्म अफगाणिस्तानात झाला आणि नंतर कुटुंबासह भारतात आले. मला त्या ठिकाणी राहत असलेल्या महिलांची काळजी वाटत आहे. अफगाणिस्तानवर आता तालिबानचे राज्य आहे.” तर अर्शी खान पुढे सांगितले की, तिचे काही नातेवाईक आणि मित्र अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. (Bigg Boss 11 contestant Arshi Khan prays for the people of Afghanistan)

अर्शी खान पुढे म्हणाली की, “मी एक अफगाणी पठाण आहे आणि यासर्व गोष्टीमुळे मला खूप भीती वाटत आहे. यासर्व घटनेमुळे माझा अंगावर शहारे येत आहेत. मला तिथल्या महिला आणि मुलांची खूप काळजी वाटत आहे. माझा जन्म तिथे झाला, पण जर मी अजूनही तिथेच राहत असते तर… असे विचार करून मला खूप भीती वाटत आहे. मी खूप दु: खी आहे आणि या घटनेमुळे मला जेवणही नीट जात नाहीये. माझ्या कुटुंबातील लोक अफगाणिस्तानमधील लोकांसाठी प्रार्थना करत आहेत. अलाह त्यालोकांना लवकर मदत करो.” त्याचबरोबर अर्शी खानने तिच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

अर्शी खान आता करण जोहरच्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होणार आहे. अर्शी आगामी भागात ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांशी संवाद साधताना आणि त्यांना टास्कसाठी आव्हान देताना दिसणार आहे. ती ओव्हर द टॉप स्पर्धक म्हणून पुढे आली आहे. अर्शी तिच्या निडर अंदाजासाठी ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग बॉसच्या घरात असणाऱ्या शमिता शेट्टीला विंदू दारा सिंगने दिला पाठिंबा म्हणाला, ‘ती खूप स्ट्रॉंग…’

-सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

-खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा

हे देखील वाचा