Friday, April 19, 2024

सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या महागड्या जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. त्यांच्यामध्ये घराची खरेदी विक्री सर्रास चालू असते. अशातच बातमी येत आहे की, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याचे मुंबईतील फॉर्च्युन हाइट्समधील जुने घर भाड्याने दिले आहे. अगोदर सैफ आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर त्यांचा मुलगा तैमूरसोबत या फ्लॅटमध्ये राहत होते. सैफ अली खान या वर्षाच्या सुरुवातीलाच कुटुंबासह एका मोठ्या घरात शिफ्ट झाला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, Indextap.com द्वारे प्रवेश केलेल्या नोंदणीकृत भाडे कराराच्या दस्तऐवजात असे दिसून आले आहे, की सैफ अली खानने असोसिएशन मीडिया एलएलपीच्या गिल्टी नावाच्या फर्मला भाड्याने हे घर दिले आहे. त्यांनी १५ लाख रुपयांचे सिक्युरिटी पैसे देखील भरले आहेत.

दरवर्षी वाढणार भाडे
सैफ अली खानच्या या अपार्टमेंटमध्ये १५०० चौरस फूट जागा आणि दोन कार पार्किंगची जागा आहे. हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात आला आहे, ज्याचे भाडे दरवर्षी वाढत जाईल. पहिल्या वर्षी भाडे ३.५० लाख रुपये दरमहा असेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी ते ३.६७ लाख रुपये आणि ३.८७ लाख रुपये होईल.

इतकी आहे संपत्तीची किंमत
सैफ अली खानच्या या अपार्टमेंटची एकूण किंमत १२ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. दोन्ही पार्ट्यांनी १३ ऑगस्ट २०२१ रोजी भाड्याने हा करार केला. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतरच सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर खान दोन्ही मुलगे तैमूर, जेह यांच्यासह सुट्टीवर मालदीवला गेला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा