Friday, July 5, 2024

‘आर्टिकल 370’ नंतर यामी गौतम सिनेसृष्टीला ठोकणार राम राम; चर्चेला उधाण

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)सध्या ‘आर्टिकल 370’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सिनेसृष्टीत या चित्रपटानंतर यामी अभिनय क्षेत्राला गुडबाय करणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. एका मुलाखतीत यामीने तिचा आई बनन्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे.
हा चित्रपट आर्टिलक 370 म्हणजेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या स्टोरीवर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. यामध्ये यामी दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, यामीने एका मुलाखतीदरम्यान, या चित्रपटासंदर्भात संवाद साधला आहे. अनेक अनुभव यावेळी तिनं शेअर केले आहेत.

यामीने २०२३ मध्ये अक्षय कुमारसोबत ‘ओ माय गॉड 2’ चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आता ती आर्टिलक 370 साठी उत्सुक आहे. मीडियाशी संवाद साधतान यामी म्हणाली, मी एक अशी अभिनेत्री आहे जी केवळ सेटवर फिल्म शुटिंगसाठी येत नाही. मला वाटते की चित्रपट निर्मिती हा एक अतिशय अवघड काम आहे. यामध्ये अनेक लोक काम करत असतात. अभिनयासोबत मला चित्रपटांच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टिंग प्रक्रियेचाही आनंद मिळतो. ‘आर्टिकल 370’ मध्ये काम करताना मला स्क्रिप्टिंगबद्दल खूप काही शिकायला मिळाले.
तसेच यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. माझ्यासाठी हा चित्रपट खुप खास आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी आई होणार आहे हे समजले. त्यानंतर या चित्रपटाच्या सेटवरील सगळे कलाकार माझी खुप काळजी घेतात. या सर्वांमुळे मला या चित्रपटात काम करणे खुप सोपे झाले.
कधी रिलीज होणार ‘आर्टिकल 370’?

‘आर्टिकल 370’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलं आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

यामीने २०२१मध्ये आदित्य धारसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांना भेटले होते. पारंपरिक पद्धतीने केलेल्या यामीच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नानंतर तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आईबाबा होणार आहेत.

यामीने २०२१ साली विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘बाला’, ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘दसवी’, ‘ओएमजी २’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही ती झळकली. हिंदीबरोबरच तिने तेलुगु चित्रपटांतही काम केलं आहे. ‘आर्टिकल 370’ या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा