Thursday, November 21, 2024
Home अन्य वाचा रामायणाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेते अरुण गोविलांबाबत काही खास गोष्टी

वाचा रामायणाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेते अरुण गोविलांबाबत काही खास गोष्टी

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये श्रीराम प्रभूंची भूमिका निभावणारे अभिनेते ‘अरुण गोविल’ यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीमध्ये अनेक भूमिका साकारल्या. परंतु ‘रामायण’ या मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. परंतु अभिनय कारकीर्दीला पूर्णविराम दिला, आणि राजकारणात प्रवेश केला. पश्चिम बंगालसह ५ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशातच १२ जानेवारी रोजी ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टींवर टाकलेली एक नजर…

मेरठमध्ये झाले पालन-पोषण
अरुण यांचा जन्म १२ जानेवारी, १९५८ मध्ये मेरठ येथे झाला होता. त्यांचे पालन- पोषणही इथेच झाले. त्यांचे शिक्षण सहारनपूर आणि शाहजहांपूर येथे झाले. त्यांनी आपले पदवी शिक्षण मथुरेच्या महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांचे वडील मेरठच्या जलनिर्माण विभागात अभियंता होते. (arun govil celebrate his birthday, lets know about his life)

‘पहेली’ चित्रपटातून केली अभिनयाची सुरुवात
त्यांनी १९७७ मध्ये ‘पहेली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘सावन में आने दो’, ‘सांच की आंच नहीं’ या चित्रपटात काम केले. या दरम्यान अरुण हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांना जास्त यश नाही मिळाले पण चित्रपट जगात त्यांनी त्यांची एक वेगळीच छाप पाडली.

रामायणमधील रामाच्या भूमिकेसाठी नाकारले गेले होते अरुण
अरुण यांना सन १९८७ साली आलेल्या ‘रामायण’ या मालिकेत ऑडिशनवेळी सुरुवातीला नाकारण्यात आले होते. परंतु एका कारणामुळे त्यांना ही भूमिका मिळण्यात यश मिळाले, ते होते त्यांचे हसणे. होय, एका मुलाखतीत अरुण यांनी स्वत: याबाबत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, “ऑडिशनमध्ये नाकारल्यानंतर सूरज बडजात्या यांनी मला एक आयडिया दिली होती की, मी आपल्या हसण्याचा वापर केला पाहिजे.”

त्यानंतर लूक टेस्टदरम्यान अरुण यांनी असंच केले आणि त्यांना ही भूमिका मिळाली. त्यांचे हसणे रामानंद सागर यांना खूप भावले आणि ते राम या भूमिकेसाठी अरुण यांना कास्ट करण्यासाठी तयार झाले.

निवडणूक लडवणार नाहीत, तर प्रचार करणार
भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पक्षाकडून सांगण्यात आले की, अरुण हे निवडणूक लढवणार नाहीत. परंतु पक्षाच्या प्रचारामध्ये सामील होतील. अरुण भाजपमध्ये सामील झाल्याने, २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ५ राज्यांमधील निवडणुकीमध्ये दक्षिण भागातील मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी एक आकर्षक चेहरा भाजपला मिळाला आहे.

‘रामायण’मधील ‘सीता’ही आहे भाजपमध्ये सामील
विशेष म्हणजे राजकारणात पाऊल ठेवणारे अरुण हे ‘रामायण’मधील पहिले कलाकार नाहीत. त्याच्याआधी ‘रामायण’मध्ये ‘रावण’ ही भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनी सन १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या साबरकांठामधून निवडणूक जिंकली होती. ‘रामायण’मधील ‘सीता’ म्हणजेच दीपिका चिखलियानेही भाजप पक्षाकडून निवडणूक लढवली आहे. त्यांनी सन १९९१ मध्ये गुजरातच्या बडोदा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. दुसरीकडे ‘रामायण’मध्ये ‘हनुमान’ ही भूमिका साकारणारे दारा सिंगदेखील भाजपकडून सन २००३ पासून २००९ पर्यंत राज्यसभाचे सदस्य राहिले आहेत.

काँग्रेसच्या जवळ असल्याच्या होत्या चर्चा
अरुण हे राजकारणात उतरणार आहेत, याची चर्चा आधीपासूनच होती. एक काळ असा होता की, ते काँग्रेस पक्षाच्या जवळ असल्याचा चर्चा होत होत्या. ते मध्यप्रदेश मधील इंदोर येथे निवडणूक लढणार आहेत, असे देखील म्हटले जात होते. परंतु त्यांनी या निवडणुकीसाठी कधी होकार नाही दिला. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. त्यांनी पाच राज्यातील निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते राजकारणात काय कमाल करतील यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा